Ulhasnagar: उल्हासनगरात आला रोबोट, अत्याधुनिकता पाहून चक्रावले नागरिक, खास सिंगापूरच्या कंपनीने लावले पैसे

उपआयुक्त आरोग्य डॉ.सुभाष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती आयुक्त डॉ.अझिझ शेख यांनी दिली.
Ulhasnagar: उल्हासनगरात आला रोबोट, अत्याधुनिकता पाहून चक्रावले नागरिक, खास सिंगापूरच्या कंपनीने लावले पैसे
Updated on

Thane Update: सिंगापूर मधील कंपनीने फायनान्स केलेला महाराष्ट्रातील पहिलाच अत्याधुनिक रिबोट उल्हासनगरात दाखल झाला आहे.

आमदार कुमार आयलानी,महानगरपालिका आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या हस्ते या रिबोटचे उद्घाटन करण्यात आले आहे.

Ulhasnagar: उल्हासनगरात आला रोबोट, अत्याधुनिकता पाहून चक्रावले नागरिक, खास सिंगापूरच्या कंपनीने लावले पैसे
Ulhasnagar Shivsena: विधानसभेच्या तोंडावर खळबळ, उल्हासनगर शिवसेना आणि महिला आघाडीची कार्यकारिणी बरखास्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश

होमोसेप मॅनहोल क्लीनिंग(रोबोट)असे या मशिनचे नाव आहे.55 लक्ष रुपये किंमतीची ही मशीन येशियन डेव्हलोपमेंट बँक सिंगापूर यांच्या वित्तीय सहायता मधून सोलीनास इंटिग्रिटी लिमिटेड कंपनी मार्फत सीआरएस फंडामधून मधून प्राप्त झाली आहे.त्यासाठी उपआयुक्त आरोग्य डॉ.सुभाष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती आयुक्त डॉ.अझिझ शेख यांनी दिली.

ही रोबोट मशीन स्वयंचलित असून चोकअप झालेल्या ड्रेनेज मध्ये उतरून त्यातील घाण बाहेर न फेकता थेट वरील टाकीमध्ये टाकणार आहे.त्यामुळे रस्त्यावर किंबहूना ड्रेनेजच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही.उद्घाटना प्रसंगी आमदार कुमार आयलानी,आयुक्त डॉ.अझिझ शेख,उपआयुक्त डॉ.सुभाष जाधव,पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे,उपअभियंता दिपक ढोले,सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे आदी उपस्थित होते.

Ulhasnagar: उल्हासनगरात आला रोबोट, अत्याधुनिकता पाहून चक्रावले नागरिक, खास सिंगापूरच्या कंपनीने लावले पैसे
Ulhasnagar: अनेक कोचिंग क्लासेस असणाऱ्या साई आर्केड इमारतीच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला !

"महाराष्ट्राच्या चित्र रथावर मिळाले होते उल्हासनगरच्या रोबोटला स्थान"

जवळपास तीन वर्षांपूर्वी रिजेन्सी निर्माण या सुप्रसिद्ध बांधकाम कंपनीचे महेश अग्रवाल,उध्दव रुपचंदानी,अनिल बठीजा आणि टाटाने अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये उतरून तुंबलेल्या कचऱ्याची साफसफाई करणारा एक रोबोट महानगरपालिकेला गिफ्ट केला होता.याच रिबोटला दोन वर्षांपूर्वी 26 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर स्थान मिळाल्यावर राज्यभरात उल्हासनगरचे नावलौकिक झाले होते.आता महानगरपालिकेकडे तीन रोबोट झाले असून त्यामुळे तुंबलेल्या ड्रेनेजच्या सफाईला गती मिळणार आहे.

Ulhasnagar: उल्हासनगरात आला रोबोट, अत्याधुनिकता पाहून चक्रावले नागरिक, खास सिंगापूरच्या कंपनीने लावले पैसे
Ulhasnagar: उल्हासनगरात खड्यांची पोलखोल, फायर ब्रिगेड पलटी होता होता वाचली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.