उल्हासनगर - कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात राहणारे उल्हासनगरातील वंचितचे माजी ठाणे जिल्हा सचिव विजय धावारे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ म्हात्रे, पदाधिकारी उल्हास फालके उपस्थित होते.