Ulhasngar: स्वर्गरथाची चाके रस्त्यात अडकली, मद्यपी चालकाला कारणे दाखवा नोटीस

Thane: महानगरपालिकेच्याच स्वर्गरथाची चाके डिव्हायडर्ससाठी सोडलेल्या जागेत फसल्याचा प्रकार समोर आला आहे.
: स्वर्गरथाची चाके रस्त्यात अडकली, मद्यपी चालकाला कारणे दाखवा नोटीस
Ulhasngarsakal
Updated on

Thane Drunk Driver : काही दिवसांपूर्वी खड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने उल्हासनगर महानगरपालिकेची अग्निशमन दलाची मोठी गाडी ही पलटी होताना वाचल्याची घटना ताजी असतानाच,महानगरपालिकेच्याच स्वर्गरथाची चाके डिव्हायडर्ससाठी सोडलेल्या जागेत फसल्याचा प्रकार समोर आला आहे.

चालक हा दारू पिऊन स्वर्गरथ चालवत असल्याचे निदर्शनास आल्यावर वाहन विभागाने या मद्यपी चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

: स्वर्गरथाची चाके रस्त्यात अडकली, मद्यपी चालकाला कारणे दाखवा नोटीस
Thane Shed Fell: रात्री बारा वाजता भर पावसात खेळत होते फुटबॉल; टर्फवर पत्रा कोसळल्याने 8 मुले जखमी

कॅम्प 4 मधील शिवाजी चौक ते आशेळे गाव मैदानाकडे जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याच काम सुरू आहे.परंतु याठिकाणी अर्धवट काम झाल्याने धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे.या रस्त्यावरून गुरुवारी दुपारी उल्हासनगर महापालिकेची शव वाहिनी म्हणजे स्वर्ग रथ जात होता.

निर्माणाधीन काँक्रीट रस्त्यावर डिव्हायडर्स लावण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी जागा ठेवण्यात आली आहे.यातच चालकाच्या हलगर्जीपणामुळे स्वर्ग रथाचे चाक जागेत फसले.त्यामुळे या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

: स्वर्गरथाची चाके रस्त्यात अडकली, मद्यपी चालकाला कारणे दाखवा नोटीस
Thane: दिव्यात घाणीचे साम्राज्य; कचऱ्यातून होतोय नागरिक, लहान मुलांचा प्रवास

दरम्यान स्वर्ग रथ चालक हा दारूच्या नशेत असल्याने व त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर्सच्या जागेत चाके फसल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनींनी मासमीडियावर व्हायरल केली.आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन आदेश दिल्यावर वाहन विभागाचे मुख अधिकारी विनोद केणे यांनी केशव नामक वाहन चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

: स्वर्गरथाची चाके रस्त्यात अडकली, मद्यपी चालकाला कारणे दाखवा नोटीस
Ulhasnagar MSEB: शॉक लागल्याने महावितरणच्या सिनिअर टेक्निशियनचा मृत्यू!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.