'उमेद'च्या कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; सरकारच्या खासगीकरण धोरणास विरोध

'उमेद'च्या कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; सरकारच्या खासगीकरण धोरणास विरोध
Updated on

मुंबई : उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणात मंगळवारी (ता. 1) राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांनी सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाबद्दल आपल्या समस्या राज यांच्यासमोर मांडल्या. कर्मचाऱ्यांचे म्हणणे एकून घेतल्यानंतर राज यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवरून याबाबत चर्चा केली. 

केंद्र सरकारचे जीवनोन्नती अभियान महाराष्ट्रात उमेद संस्थेतर्फे राबवले जाते. हे अभियान खासगी संस्थेकडे वर्ग करण्याचा घाट राज्य सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी या वेळी केला. यासाठी सरकारदरबारी काय हालचाली सुरू आहेत. याबाबत संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राज यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज यांनी याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. 

राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदची (एमएसआरएलएम) 2011 पासून अंमलबजावणी होत आहे. याकरिता सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली; मात्र उमेद बाह्य संस्थेला देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत राज्यात सर्वत्र बचतगटांच्या महिला यापूर्वीही रस्त्यावर उतरल्या होत्या. उमेद संस्थेच्या खासगीकरणाविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर बचतगटांच्या महिलांनी मोर्चा काढला होता.

राज्यात 4 लाख 79 हजार 174 समूह स्थापन करण्यात आले असून, यामध्ये 49 लाख 44 हजार 656 कुटुंब या कर्मचाऱ्यांनी जोडलेली आहेत; मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक अनेक जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदावर कार्यरत कर्मचारी यांच्या सेवा सरकारने अन्यायकारक पद्धतीने समाप्त केल्या गेल्याने अभियानाचे खासगीकरण होत असल्याचा आरोप होत आहे. 

Umed employees meet Raj Thackeray
----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.