नवी मुंबईत नव्या वर्षाच्या शुभेच्छांचे अनधिकृत होर्डिंग्स, पालिकेचं दुर्लक्ष

नवी मुंबईत नव्या वर्षाच्या शुभेच्छांचे अनधिकृत होर्डिंग्स, पालिकेचं दुर्लक्ष
Updated on

मुंबईः  नवी मुंबई महापालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे दिसून आले आहे.  नूतन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईत ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे विनापरवाना होर्डिंग्ज लागले आहेत. विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानमध्ये पालिका स्वच्छताकडे लक्ष देत असताना शहरातील भिंती रंगवून शहराच्या सौंदर्यकरणात भर घालत आहे. तर राजकीय नेते शहराच्या कुठल्याही भागात अनधिकृत होर्डिंग बाजी करून शहर विद्रुप करत आहे.

पालिका प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंगबाजी खपवून घेणार नाही, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र संबंधित अतिक्रमण विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे होर्डिगबाजांनी पुन्हा तोंडवर काढल्याचे दिसून आले आहे.

शहर विद्रूप करणार्‍या बेकायदा होर्डिंगबाजीला आळा घालण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या नवी मुंबईत मात्र या आदेशाला सपशेल हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. कारण या आदेशाची अंमलबजावणी करण्यात खुद्द प्रशासनाकडूनच हलगर्जीपणा केला जात असल्याने फुकट्या होर्डिंगबाजाचे चांगलेच फावले आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये पालिकेने प्रथम क्रमांक येण्यासाठी कंबर कसली आहे. सकाळच्या वेळी पालिकेचे अधिकारी स्वच्छता अभियानसाठी पाहणी दौरे करण्यासाठी फिरतात. पण अनधिकृत होर्डिंगबाजी करून शहर विद्रुप करणारे राजकीय नेते पालिका प्रशासनाला कसे दिसत नाही असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

याचा परिणाम म्हणून कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, घणसोली, तुर्भे या भागात मोठ्या प्रमाणात विनापरवाना होर्डिंग लावण्यात आले आहेत. तुर्भे येथील स्कायवॉक, ऐरोली येथील स्कायवॉक, वाशी येथील अभ्युदय बँकेच्या समोरील चौकात ही विविध पक्षाच्या शुभेच्छा देणार्‍या होर्डिंग्ज लावल्याचे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे कोपरखैरणेतील डी मार्ट चौकात, ऐरोली स्टेशन नजीक परिसरात सुध्दा मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभारण्यात आले आहेत. महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडून या प्रकाराकडे सोयीस्कररित्या डोळेझाक केली जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

या संदर्भात अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संपर्क साधला असता अनधिकृत होर्डिंग बाजी केलेले असल्यास ते त्वरित हटवण्यात येतील. तसेच पालिकेकडून अनधिकृत होर्डिंग बाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Unauthorized hoardings happy new year Navi Mumbai neglected by the municipality

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.