Ghodbandar Fort: घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणावेळी जमिनीखाली सापडले तळघर

Virar : पुरातत्व विभागाला कळविण्यात आले असून मंगळवारी अधिकारी आल्यावर या रहस्याचा उलघडा होणार आहे.
Ghodbandar Fort: घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणावेळी  जमिनीखाली सापडले तळघर
Updated on

Mira Bhayandar: मीरा भाईंदर महानगर पालिका हद्दीतील घोडबंदर येथील किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम सुरु असतानाच प्रवेशद्वाराच्या कमानी साठी खोदकाम सुरु असताना त्या ठिकाणी काही विलक्षण भिंती असलेले तळघर दिसत आहे .

कदाचित हाच तो बहुचर्चित भुयारी मार्ग असावा असा अंदाज स्थनिक नागरिक व्यक्त करत आहेत. हे भुयार असेल तर ते वसईच्या किल्ल्यात निघत असावे असे सांगण्यातयेत आहे. याबाबत पुरातत्व विभागाला कळविण्यात आले असून मंगळवारी अधिकारी आल्यावर या रहस्याचा उलघडा होणार आहे.

Ghodbandar Fort: घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणावेळी  जमिनीखाली सापडले तळघर
Virar Encroachment: विरारमध्ये नाल्यावर अतिक्रमण, पावसाळयात मोठा धोका

शासनाच्या स्वरक्षित स्मारक योजने अंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेला घोडबंदर किल्ला ९ फेब्रुवारी २०१९ ला दत्तक देण्यात आला आहे. १४ करोड रुपये खर्चून किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात यात असून, हे काम आता अंतिम तोपयंत आले आहे. त्याच वेळी किल्ल्याच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ कमानीसाठी खोदकाम सुरु असताना काही विलक्षण भिंती असलेले तळघर आणि बाजूला गवाक्ष सारखे दिसत आहे.

त्यामुळे पूर्वीचे लोक इतिहास सांगताना सांगायचे कि या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग वसई किल्ल्यात निगत होता. तो मार्ग कदाचित इथूनच सुरु होत असावा असे बोलले जात आहे. याबाबत पालिकेने आणि माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी पुरातत्व विभागाला कळवले असून, पुरातत्व विभागाचे अधिकारी मंगळवारी याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. तयावेळी हे भुयार आहे का? किंवा अन्य काही याचा उलघडा होणार आहे.

तसेच हे भुयार असलेतरी ते वसईच्या किल्ल्यात निघते हि अन्य थकिकांनी याच्यावर हि प्रकाश पडणार आहे तसेच त्या काळात समुद्राच्या खालून भुयार खोदण्याचे एवढे तंत्रज्ञान विकसित होते का? यावरही प्रकाश पडणार आहे.

Ghodbandar Fort: घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणावेळी  जमिनीखाली सापडले तळघर
Virar News : वीस रूपयांसाठी पोलिसाने दुकान दाराचे नाक फोडले

पूर्वीच्या काळी घडबंदर हे व्यापाराचे मोठे केंद्र होते. त्यातल्यात्यात घोड्याच्या विक्रीचे केंद्र होते. त्याच बरोबर याठिकाणहून समुद्रावरही लक्ष ठेवणे सोपे जात असल्याने या किल्याला मोठे महत्व होते. त्यामुळे या किल्ल्यावर हल्ला झाल्यास सुरक्षितपणे बाहेर जाण्यासाठी त्याकाळी भुयार बनविले असण्याची श्यक्यता याठिकाणी वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे याचे संशोधन झाल्यास सर्व बाजूवर प्रकाश पडणार आहे.

पूर्वीच्या काळी घोडबंदर हे एक महत्वाचे व्यापारी बंदर होते. याठिकाणावरून शत्रूवर नजर ठेवली जात होती. त्यावेळी किल्ल्यावर शस्त्रसाठा, अन्नधान्याचा मोठा साठा असायचा तसेच याठिकाणी अरब आणि ग्रीस मधून चांगल्या प्रतीचे घोडे विकण्यासाठीआणले जात होये.

त्यामुळे व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या या किल्यावरील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भुयारी मार्ग बनविला असावा . असे वाटते. या सगळ्याचा उलघडा मंगळवारी येणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्या कडून होऊ शकणार आहे. जर भयारि मार्ग मिळाल्यास त्याचा फायदा होऊ शकणार आहे.

Ghodbandar Fort: घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणावेळी  जमिनीखाली सापडले तळघर
Virar Hospital Fire: "ती कोरोनातून बरी झाली होती पण..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.