Taloja Jail : बाटलीत डास भरले अन् त्यानं थेट कोर्टच गाठलं; कैद्याच्या 'त्या' मागणीवर न्यायाधीशही हैराण

सध्या डेंग्यूची साथ देशभर पसरली आहे. आतापर्यंत हजारो लोकांना याचा फटका बसला आहे.
Mosquitoes
Mosquitoesesakal
Updated on
Summary

सध्या डेंग्यूची साथ देशभर पसरली आहे. आतापर्यंत हजारो लोकांना याचा फटका बसला आहे.

सध्या डेंग्यूची (Dengue) साथ देशभर पसरली आहे. आतापर्यंत हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. या धोकादायक आजारामुळं अनेकांचा मृत्यूही झाला आहे. डासांच्या या समस्येमुळं कारागृहातील कैदीही हैराण झाले आहेत. मुंबईच्या (Mumbai) तळोजा कारागृहातही (Taloja Jail) कैद्यांना डासांचा त्रास जाणवू लागलाय.

एका कैद्यानं (Prisoner) तुरुंगात मच्छरदाणी वापरण्याची परवानगी मिळण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला. त्यानं कारागृहातील डास एका बाटलीत भरले आणि कोर्ट गाठलं. त्यानं कोर्टात न्यायाधीशांना सांगितलं की, त्याला आणि इतर कैद्यांना डासांचा त्रास होत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला मच्छरदाणी वापरण्याची परवानगी द्यावी. यावर कोर्टानं म्हटलं, 'आरोपीला ओडोमोस आणि इतर रिपेलंट वापरण्याची परवानगी आहे, अशा स्थितीत आम्ही आपली ही याचिका फेटाळत आहोत.'

Mosquitoes
'प्रकाश आंबेडकरांबाबत माहित नाही, पण उद्धव ठाकरे ओवैसींच्या गळाभेटीसाठी हैद्राबादची वारी करतील'

ही घटना गुरुवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात घडली. तळोजा कारागृहातील कैदी एजाज लकडावाला याच्यावर अनेक प्रकारचे फौजदारी खटले सुरू आहेत. त्याची प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. लकडावाला कोर्टात पोहोचला आणि त्यानं डासांनी भरलेली बाटली न्यायाधीशांना दाखवली आणि सांगितलं की, 'तुरुंगातील डासांमुळं मला आणि इतर कैद्यांना खूप त्रास होत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला इतर कैद्यांप्रमाणं मच्छरदाणी वापरण्याची परवानगी द्यावी.'

Mosquitoes
Ajmer : सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला हॉटेलमध्ये बेदम मारहाण; आरोपीनं रुग्णालयात नेलं अन्..

लकडावाला व्यतिरिक्त, अनेक तुरुंगातील कैद्यांनी इतर न्यायालयात अशाच याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, न्यायालयानं लकडावालाची याचिका फेटाळून लावली. लकडावालाला 2020 मध्ये कोर्टानं न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. तेव्हापासून तो तळोजा कारागृहात आहे. त्यानं सांगितलं की, 'त्यावेळी मला मच्छरदाणी वापरण्याची परवानगी होती. पण, मे महिन्यात कारागृहात शोधमोहीम राबवण्यात आली, त्यावेळी माझी मच्छरदाणी जप्त करण्यात आली.' कारागृहातील अनेक कैद्यांना मच्छरदाण्या देण्यात आल्याचंही लकडावालानं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.