कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू तारिक परवीनच्या पुतण्याला अटक

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू तारिक परवीनच्या पुतण्याला अटक
Updated on

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील बांधकाम व्यवसायाची सूत्रे सांभाळणारा कुख्यात डॉन तारिक परवीनच्या पुतण्याला ओशिवरा पोलिसांनी नुकतीच अटक केली. सलमान जुबेर परवीन (24) असे या आरोपीचे नाव आहे.  एका 24 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्याच घरात 66 लाखांची चोरी केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने सलमानला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबई सेंट्रल परिसरात राहणारा सलमान जुबेर कुरेशी याला जुगाराचा प्रचंड नाद होता. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर तो सट्टा लावायचा. 2 वर्षांपूर्वी त्याची ओळख पीडित महिलेशी झाली होती. त्यावेळी सलमाननं आपण वेबसाईट बनवण्याचे काम करत असल्याचे मुलीला सांगितले होते.  पीडित महिलाही ओशिवरा परिसरात तिची बहिण आणि आईसोबत राहात होती. त्यामुळे सलमानचे पीडित मुलीच्या घरी येणे-जाणे होते. याच दरम्यान दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे लग्नाचे आमिष दाखवून सलमाननं पीडित महिलेशी शारिरीक संबध ठेवले. त्यावेळी महिलेने तिच्या कमाईतून 66 लाखांचे मौल्यवान दागिने बनवून ठेवले होते. हे दागिने तिने तिच्या लाँकरमध्ये ठेवले होते. ज्याची माहिती सलमानला होती.

दरम्यान आयपीएल मॅचवर लावण्यात आलेल्या सट्ट्यावर सलमानचे मोठे नुकसान झाले होते. कर्जबाजारी झालेल्या सलमानकडे देणे करऱ्याचे पैसे भागवण्यासाठी पैसे नव्हते. त्याच दरम्यान म्हणजे 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान पीडित महिला तिच्या आईसह तिच्या कर्नाटक येथील गावी गेली होती. ही संधी साधून सलमानने पीडित मुलीची बहिण कामानिमित्त घराबाहेर असताना बनावट चावीने घरातील तिजोरीत चोरी करून, त्या ठिकाणी त्याच  दुसरी तिजोरी आणून ठेवली. 

तिजोरीतले दागिने त्याने आग्रीपाडा आणि मुंबई सेंट्रल येथील सराफांना विकले. पीडित महिला गाववरून आल्यानंतर तिने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी उघडत नसल्यामुळे तिने ती तिजोरी तोडली. त्यावेळी त्यात 66 लाखांचे दागिने नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने याची माहिती देण्यासाठी सलमानला फोन केला. मात्र त्याचा फोन बंद येत होता. या प्रकरणी महिलेने आधी ओशिवरा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात चोरीची तक्रार नोंदवली. मात्र सलमानचा फोन दोन ते तीन दिवस बंद येत असल्याने तिला सलमाननेच ही चोरी केल्याचा संशय आला. तिने त्याच्या मित्राच्या नंबरवर फोन करून सलमानला दागिने परत  करण्याची विनंती केली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे देत, लग्नही करणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार मुलीने पुन्हा ओशिवरा पोलिसात सलमान विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी सलमानवर 376(2), 380, 417 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी सलमानचा शोध सुरू केला. मात्र त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. चोरी दरम्यान सलमान त्याच्या जयपूरच्या एका मित्राच्या वारंवार संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. याच दरम्यान सलमानने फोन सुरू करून ‘व्हि चॅट’हून त्याच्या मित्राला काही मेसेज केले. त्यावरून सलमान देखील जयपूरमध्येच असल्याची पोलिसांना खात्री पटली.  त्यावेळी ओशिवरा पोलिसांना सलमानला जयपूर येथून अटक केली. 

बंगलोरमध्येही सलमान विरोधात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सलमान हा दुसरा तिसरा कुणी नसून कुख्यात गुंड तारीख परवीनचा पुतण्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यातील चोरीचा माल हस्तगत केला आहे.

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

underworld don Dawood Ibrahim confidant Tariq Parveen nephew arrested

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.