Virar News: गुढीपाडव्याला दुर्दैवी घटना! विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पात गुदमरून चार कामगारांचा मृत्यू

Virar News: आज मंगळवार सकाळी साडेअकराच्या सुमारास विरारमध्ये हा प्रकार घडला. ग्लोबल सिटी येथे रुस्तमजी शाळेच्या बाजूला प्लांटमध्ये हा प्रकार घडला.
Virar News
Virar Newsesakal
Updated on

Virar News: विरारमध्ये एका खासगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे विरार परिसरात शोककळा पसरली आहे.

आज मंगळवार सकाळी साडेअकराच्या सुमारास विरारमध्ये हा प्रकार घडला.  ग्लोबल सिटी येथे रुस्तमजी शाळेच्या बाजूला प्लांटमध्ये हा प्रकार घडला. साफसफाईसाठी खासगी कंपनीचे चार मजूर खाली उतरले होते. यावेळी एक मजून प्लान्टमध्ये पडला त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन मजूर उतरले. ते वर न आल्याने आणखी एक मजूर खाली उतरला. मात्र या चारही मजूरांचा मृत्यू झाला आहे. (Virar news)

शुभम पारकर (28) निखिल घाटाळ (24) सागर तेंडुलकर (29) आणि अमोल घाटाळ अशी मृत कामगारांची नावे आहेत . ग्लोबल सिटीमधील १२४ इमारतींचा हा एसटीपी प्लांन्ट आहे. या साफसफाईची जबाबदारी पॉलीकॅप या कंपनीला दिली होती. वसई-विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.  अर्नाळा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. 

Virar News
Lok Sabha Elections: "उमेदवारांना प्रत्येक संपत्ती जाहीर करण्याची गरज नाही, जोपर्यंत..."; सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.  ऑक्सीजन सिलेंडरचा वापर करून पाण्याच्या टाकीतून आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अद्याप एकाचा शोध सुरु आहे. 

Virar News
Sangali Lok Sabha: सांगलीसाठी शिवसेनेनं जोर का लावला? काँग्रेसची पिछेहाट का झाली? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.