अनलॉक सुरू होताच सोनसाखळी चोरही सक्रिय; मुंबईत एका दिवसात 8 घटना उघडकीस

अनलॉक सुरू होताच सोनसाखळी चोरही सक्रिय; मुंबईत एका दिवसात 8 घटना उघडकीस
Updated on

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईत पावलोपावली पोलिस तैनात होते. मात्र, लाॅकडाऊन शिथिल होताच मुंबईत आता सोनसाखळी चोरांनी डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात सोनसाखळी चोरीच्या तब्बल 8 घटना घडल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. पश्चिम उपनगरात सर्वाधित सोनसाखळीच्या घटना घडत आहेत. काल दिवसभरात मालाड, मुलुंड, अंधेरीत दोन घटना, जुहू, पायधुनी, विक्रोळी, शिवडी, विलेपार्ले पोलिसांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबईत सोमवारी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या आठ घटनेपैकी तीन गुन्ह्यात म्हणजे पायधुनी, शिवडी आणि मालाड येथील गुन्ह्यात सोनसाखळी चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मालाड येथील घटनेत आरोपी इमरान युसुफ अन्सारी(वय 35) याने पहाटे 6 च्या सुमारास पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात जात असलेल्या महिलेचा पाठलाग करून तिची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. मात्र, महिलेने आरडा ओरडा केल्यानंतर काही अंतरावर स्थानिकांनी आरोपी इमरानला पकडून त्याची धुलाई केली. यामध्ये इमरानचा जखमी झाला असून त्याच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर शिवडी चांदणीचौक येथील घटनेत आरोपी अहमद कालसेकर (वय 22) आणि त्याच्या साथीदाराने 20 वर्षीय तरुणाला रस्त्यात गाठत, त्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि खिशातील पैसे घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. या झटापटीवेळी तेथील उपस्थित नागरिक त्या तरुणाच्या मदतीला आल्याने कालसेकर सापडला. मात्र, त्याचा साथीदार पळून गेला. अहमद हा सराईत आरोपी असून त्याच्या विरोधात या पूर्वीही नागपाडा, काळाचौकी, डीबीमार्ग, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पायधुनी पोलिसांनी रहिम अब्दुल रहिम शेख याला सोनसाखळी चोराला अटक केली आहे. काल दिवसभरात घडलेल्या बहुतांश गुन्ह्यात आरोपींनी माँर्निक वॉक निमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष केले असल्याचे दिसले. त्यामुळे मॉर्निक वॉकला जाताना विशेषता महिलांनी काळजी घ्यायला हवी. या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आता गस्त वाढवली असल्याचे सांगितले जात आहे

---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.