आपल्या देशाने जेव्हा प्राणघातक विषाणूशी आणि आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लढा दिला, तेव्हा अनेक कोरोनायोद्धे एका वेगळ्या आघाडीवर लढत होते, जे इंधनपुरवठा सुरळीत व्हावा आणि स्वयंपाकघरातील चूल पेटती राहावी, यासाठी कटिबद्ध होते. अशा कोरोनायोद्ध्यांपैकी एक म्हणजे इंडियन ऑईल परिवार. ज्यात कंपनीचे कर्मचारी, वितरक आणि विक्रेते, एलपीजी गॅस घरोघरी वितरित करणारी मुले, टॅंकरवरील कर्मचारी आणि मेकॅनिक यांचा समावेश आहे. त्यांनी कोरोनापासून सुरक्षिततेसाठी स्वच्छतेचे तसेच सर्व ते नियम पाळून अर्थव्यवस्थेची चाके निरंतर धावती ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत.
इंडियन ऑईल कंपनीने विविध टप्प्यांवर कोव्हिड- १९ साठी कार्यक्रमाची आखणी केली. सुरुवातीला कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सूचनावली देण्यात आली. कंपनीच्या अंतर्गत संवाद साधनांच्या माध्यमातून या सूचना वेळोवेळी आणि नियमितपणे कर्मचाऱ्यांना देण्यात येत होत्या. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सोशल डिस्टंसिंगसंदर्भात किरकोळ विक्री केंद्रांना भेट देणाऱ्या आपल्या ग्राहकांत तसेच शेवटच्या ग्राहकापर्यंत उत्पादन पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी चॅनेल पार्टनर्सना सहभागी करून घेण्यात आले.
कंपनीने आपले कर्मचारी, सेवा पुरवठादार, कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी, पेट्रोल पंपधारक आणि कस्टमर अटेंडंटस, एलपीजी वितरक आणि डिलिव्हरी बॉईज आदींच्या आरोग्य आणि सुरक्षेवर विशेष भर दिला. कंपनीच्या इंधन केंद्रावर वैयक्तिक स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक विशेष उपकरणे देऊन कामकाजास प्रारंभ करण्यात आला. पेट्रोलियम उत्पादने पेट्रोल पंपापर्यंत वाहून नेणाऱ्या टॅंकरचालकांची आरोग्यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात आली.
आघाडीवर कार्यरतइंडियन ऑईलच तेलशुद्धीकरण विभागातील सर्व कर्मचारी आघाडीवर राहून कार्यरत होते. त्या सर्वांनी इंडियन ऑईलच्या ‘स्पिरिट’चे दर्शन घडविले. तेलशुद्धीकरण टीमचे सदस्य एलपीजी बॉटलिंग प्लांटच्या सहकाऱ्यांसोबत काम करीत होते. या दोघांनीही उत्कृष्ट ताळमेळ दाखवला. अत्यंत कठीण काळात जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी तेलशुद्धीकरण टीमच्या सदस्यांनी बॉटलिंग टीमच्या सदस्यांना पाठबळ दिले.
अडथळे असूनही देशभरात इंधन उपलब्धता सुनिश्चित करणे : या कठीण काळात सर्व मान्यताप्राप्त माध्यमातून आपत्कालीन इंधनपुरवठा सुनिश्चित करण्याची आपली कटिबद्धता इंडियन ऑईलने दाखवून दिली. आपापल्या कार्यक्षेत्रात आवश्यक सेवेचा पुरवठा अखंडित राहावा, यासाठी इंडियन ऑईलच्या साठवणूक करणाऱ्या मोठ्या आस्थापना, एलपीजी बॉटलिंग प्लांट्स, इंधन केंद्रे, एलपीजी वितरक संबंधित राज्य सरकार, / स्थानिक प्रशासन यांनी घालून दिलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करून कार्यरत होते. इंडियन ऑईलने सर्व विमानतळांवर आपत्कालीन पुरवठा सुरळीत केला. आपल्या ‘११९ : एव्हिएशन फ्यूएलिंग स्टेशन्स’च्या जाळ्यातून वैद्यकीय रुग्णवाहिका आणि वंदे भारत विमानांना इंधनपुरवठा प्रदान करण्यात आला.
इंडियन ऑईलची ग्राहकांप्रति बांधिलकी आहे. या संकल्पना खऱ्या अर्थाने पाठबळ दिले ते उत्साही इंधन वाहतूकदारांनी आणि त्यांच्या परिवहन सदस्यांनी ते खऱ्या अर्थाने करोनायोद्धे आहेत आणि या महामारीशी देशाच्या लढाईत ते सर्वात आघाडीवर आहेत.
अशा कठीण आणि कसोटीच्या प्रसंगात पीओएलचा पुरवठा सुरळीत आणि अखंडित ठेवणे हे एक खडतर आव्हान असते. राज्याच्या कानाकोपऱ्यात जेव्हा पुरवठा करायचा असतो, तेव्हा आव्हाने आणि अडचणी कित्येक पटींनी वाढतात. स्थानिक प्रशासनाचे कित्येक स्तर, रस्त्याच्या बाजूला असलेले ढाबे, विश्रांतीची ठिकाणे तसेच वाहनदुरुस्ती केंद्रे बंद असणे, अशा समस्या वाहतुकीतील मोठे अडथळे ठरतात; मात्र समर्पित भावनेने काम करणाऱ्या वाहतूकदारांच्या चमूने या आव्हानांवर यशस्वी मात केली आणि पीओएल उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि त्याच वेळी कोव्हिड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि सरकारने घालून दिलेले सुरक्षाविषयक नियम कसोशीने पाळले. इंडियन ऑईलने आपल्या वाहनचालकांसाठी सीलबंद खाद्यपदार्थांसह फेस मास्क, हॅंडवॉश आणि वैयक्तिक स्वच्छता अशा अन्य उपाययोजनांचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली होती.
घरगुती वापराच्या गॅसची वाढलेली मागणी यशस्वीपणे हाताळली : पेट्रोल, डिझेल, एटीएफ, बिटूमेन आदी प्रमुख पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीत घट झालेली असली, तरी घरगुती वापराच्या गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. घरगुती वापराच्या गॅसची वाढलेली मागणी यशस्वीपणे हाताळण्यासाठी इंडियन ऑईलने एलपीजी उत्पादन करणाऱ्या आपल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पात कामकाजाला विशेष गती दिली. एलपीजी उत्पादन वाढविण्यात आले. त्याशिवाय विविध बंदरांच्या ठिकाणी एलपीजी आयात वाढविण्यात आली. बॉटलिंग प्लांट्समधील कामकाज आणि एलपीजी सिलिंडर्सचे वितरण त्याप्रमाणे सुरळीत आणि नियोजनबद्धपणे करण्यात येत होते. साधारणपणे इंडियन ऑईलने देशभरात प्रतिदिन सरासरी २६.६५ लाख गॅस सिलिंडर्सचा पुरवठा केला जो पूर्वी २६.६५ लाख सिलिंडर्स इतका होता. (२४ मार्च २०२० रोजी म्हणजेच लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी.) आमचे वचन पाळले इंडियन ऑईलने सिक्कीमसारख्या दुर्गम भागात कार्यरत असणाऱ्या सुरक्षा जवानांप्रति असलेली कटिबद्धता पूर्ण केली. समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असलेली ठिकाणे जसे की, याथान्ग (१२ हजार फूट), चांगू आणि याँगडी (१५ हजार फूट) अशा ठिकाणी पुरवठा प्रभावित झाला होता. इंडियन ऑईलने ‘विंटर स्टॉकिंग ॲक्टिव्हिटी’ या अत्यंत आधुनिक उपक्रमाला सुरुवात केली. हा अशा प्रकारचा जगातील सर्वात मोठा उपक्रम मानला जातो. या उपक्रमात १ लाख २० किलोलिटर इंधन आणि ३ हजार ३०० टन एलपीजी उंच डोंगरातील खिंडीतून अत्यंत दुर्गम भागात असलेल्या लडाखमध्ये तसेच किन्नौर, लाहौल - स्पिटी, आणि हिमाचल प्रदेशमधील चंबा अशा अतिउंच प्रदेशात वाहून नेण्यात आले. इंडियन ऑईलच्या जम्मू, जालंधर आणि संगरूर टर्मिनल्स मधून ३-४ महिन्यांसाठी पुरवठा विस्कळित झाला होता.
सुरक्षेच्या सर्वोच्च मानकांची हमी वितरण साखळीत समाविष्ट असलेल्या सर्व इंधन केंद्रांवर शक्य होतील, तेवढे निर्जंतुकीकरणाचे उपाय योजण्यात येत आहेत. भूपृष्ठभागावरील प्रदूषण कमी करण्यासाठी इंडेन सिलिंडर्सचे गोदामात निर्जंतुकीकरण करण्यात आले. रिकामे तसेच भरलेले सिलिंडर्स वाहून नेणाऱ्या ट्रक्सचे बॉटलिंग प्लांट्समध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. इंडियन ऑईलच्या काही बॉटलिंग प्लांटमध्ये वाहनचालकांसाठी मनुष्य संपर्कविरहित हॅन्ड सॅनिटायझिंग सुविधा सुरू करून देण्यात आली होती. घरगुती ग्राहकांना सिलिंडर्सचे वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वितरण करतेवेळी व्यक्तिगत सुरक्षेची सर्व ती साधने उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याशिवाय सोशल डिस्टंसिंग संदर्भात त्यांना जागरूक करण्यात आले आणि व्यक्तिगत सुरक्षेचे नियम पाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या.
स्थानिक प्रशासनाने संपूर्ण टाळेबंदी जाहीर केलेल्या भागात, इंडियन ऑईल पॉईंट डिलिव्हरीज करीत आहे. विविध इंधन केंद्रांवर ग्राहकांशी थेट संपर्क येणारे कर्मचारी स्वच्छतेचे सर्व नियम आणि निकष पाळतात; तसेच वाहनात इंधन भरताना मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर्सचा वापर करतात. इंधन केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचा नोटांशी संबंध येऊ नये किंवा कमीत कमी संबंध यावा, याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी ग्राहकांना रोख रक्कम देण्याऐवजी ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. जिथे मोठ्या प्रमाणात काम केले जाते अशा ठिकाणी म्हणजेच डेपो आणि टर्मिनल्समध्ये विशेष काळजी घेण्यात आली. डेपो आणि टर्मिनल्समध्ये पेट्रोलियम पदार्थ भरून घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांचे स्प्रिंकलर्सचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कर्मचाऱ्यांची तसेच अन्य लोकांची कॉन्टॅक्टलेस थर्मोमीटरच्या माध्यमातून तापमान चाचणी करण्यात आली; तसेच व्यक्तिगत सुरक्षेसाठी देण्यात मानकांची तसेच अनुपालनाच्या नियमांची माहिती त्यांना वेळोवेळी देण्यात आली. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी टॅंक ट्रक्सचे वाहनतळ, वाहतूक कर्मचाऱ्यांची विश्रामगृहे, उत्पादने भरण्याच्या जागा आदी शक्य तितक्या प्रमाणात निर्जंतुक करण्यात आल्या. जिथे मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात अशा ठिकाणी म्हणजेच डेपो आणि टर्मिनल्सच्या ठिकाणी इंडियन ऑईलचे कर्मचारी आणि वाहतूक कर्मचारी ह्यांचा थेट संपर्क येऊ नये किंवा कमीत कमी संपर्क यावा, यासाठी कंपनीने डिलिव्हरी चलनावर प्रत्यक्ष स्वाक्षरीच्याऐवजी ऑटो इमेज प्रिंटिंग हा नवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा उपक्रम सुरू केला.
आयओसी क्लीन
देशभरात जेव्हा सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा इंडियन ऑईलने ‘आयओसी क्लीन’ हे हातावर वापरायचे अल्कोहोल आधारित सोल्युशन संशोधित केले. जे सरकारी इस्पितळे आणि पोलिस ठाण्यात मोफत वितरित करण्यात आले.
इंडियन ऑईल केअर्स
संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांनी (एलपीजी शोरूममधील कर्मचारी, डिलिव्हरी बॉईज, मेकॅनिक्स, किरकोळ विक्री केंद्रात ग्राहकांशी थेट संपर्क येणारे कर्मचारी, ट्रकचालक आणि गोडाऊन किपर्स) दिलेली साहसी आणि उल्लेखनीय सेवा लक्षात घेऊन, जे कर्मचारी जोखमीच्या काळात प्रत्यक्ष मैदानात उतरून सेवा देत होते, अशा कर्मचाऱ्यांचा कोव्हिड- १९ मुळे मृत्यू झाल्यास त्यांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा इंडियन ऑईलने केली. कोव्हिड- १९ संदर्भातील आजार उद्भवल्यास आपल्या इंधन केंद्रांवरील पंप अटेंडंटस, डिलिव्हरी बॉईज आणि ड्रायव्हर अशा ३.२३ लाख कर्मचाऱ्यांवर उपचारांसाठी इंडियन ऑईलने प्रत्येकी लाख रुपयांचा वैद्यकीय विमा घेतला. देशाच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देताना कोव्हिड - १९ उपाययोजनांसाठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर्स निधीत इंडियन ऑईलने २२५ कोटी रुपये योगदान दिले. याच निधीत इंडियन ऑइल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या दोन दिवसांचे वेतन दान केले. ज्याची रक्कम २३.९९ कोटी रुपये इतकी होते. सरकारने जाहीर केलेल्या ताळेबंदीमुळे अनेक लोक अडचणीत सापडले. अशा लोकांना इंडियन ऑईलचे कर्मचारी आणि इतर स्थानिक भागीदार यांनी खूप मदत केली. त्यांनी अशा लोकांना सोशल डिस्टंसिंग संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करताना जेवण, अन्नधान्य, मास्क, साबण आदींचा पुरवठा केला.
--------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Unmasking Happiness Indian Oil serves India in times of family corona crisis
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.