Unseasonal Rain: ठाण्यात शेतकऱ्यांला बसला अवकाळीचा फटका; पिकांचे मोठे नुकसान

घरे,आंबा बागायतदार व वीटभट्टीचे पण नुकसान ,वीजपुरवठा खंडित
Mumbai news
Unseasonal Rain: ठाण्यात शेतकऱ्यांला बसला अवकाळीचा फटका; पिकांचे मोठे नुकसान sakal
Updated on

Thane News: काल रात्री साडेसातच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. किन्हवली,शेणवा व डोळखांब परीसरात अनेक घरांची छप्परे उडाली असून आंबा बागायतदार,काकडी, भेंडी आदी रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टीचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारा तुटल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

Mumbai news
Thane News: ठाण्याच्या बाजारात पिवळा कलिंगड दाखल; मिळतोय संमिश्र प्रतिसाद

सोसायट्याचा वारा व अवकाळी पावसाने शेणवे,किन्हवली, डोळखांब,टाकीपठार आदी परीसरात धुमाकूळ घातला.

आपटे येथील जिल्हा परिषद शाळा, माणेखिंड येथील अनिल सपाट, काशिनाथ गोडांबे,कानडी- झापवाडी येथील दौलत धर्मा शिद, शिरवंजे येथील उत्तम बांगर, लक्ष्मण लातार,सावरोली येथील गणेश आराज यांची राईसमिल,टिकबाईपाडा आदी गावांतील अनेक आदिवासी ,शेतमजूर व शेतकऱ्यांच्या घरांची,गोठयांची छप्परे उडाली असून काही घरे कोसळून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

Mumbai news
Thane Loksabha: शिंदेंचा गेम हाणारच? निवडणूक लढवण्यास 'हा' नेता उत्सूक; म्हणाले पक्षाने संधी दिली तर..

घरातील कपडे, धान्य,गृहपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणत नासधूस झाली आहे.गुरे, ढोरे व अनेक जण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. अनेक ठिकाणी विजवाहक तारा तुटून रस्त्यांवर पडल्या होत्या, त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. काकडी,भेंडी,घोसाळे, कारले,घेवडा आदी.

रब्बी पिके व आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.कच्च्या आंब्यांचा पडलेला खच बघून शेतकरी त्याकडे हताशपणे बघत होते. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून बधितांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Mumbai news
Thane: "..तर समजेल जिल्ह्याचे नेतृत्व करायची तरी क्षमता आहे का ?" आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.