मोखाडा: पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात ऑक्टोबर अखेर पर्यंत परतीचा आणि अवकाळी पाऊस कोसळला आहे. त्यामुळे कापणीला आलेले ऊभे पीक शेतातच आडवे झाले आहे. तर शेतात कापुन वाळवत ठेवलेले पीक पाण्यावर तरंगल्याने, शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहे. असे असतानाही ऐन दिवाळी सणात ऊरले, सुरलेले पीक गोळावण्यासाठी शेतकर्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. आपल्या नाही तर आपल्या जित्राबांची भुख भागवण्यासाठी शेतकरी ही धडपड करत आहेत.