सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या बोकडवीरा पोलिस चौकी ते कोट नाकादरम्यानच्या १६०० मीटर लांबीच्या उरण पनवेल मार्गाचे रुंदीकरण होणार आहे.
त्यामुळे सात मीटर रुंद असलेला हा मार्ग आता १४ मीटर रुंद होणार आहे, तसेच या मार्गाला दुभाजकही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदाही काढली आहे, मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. हे काम निवडणूक संपताच सुरू होणार आहे.