Uran Railway: उरण - खारकोपर लोकल लवकरच धावणार? रेल्वेकडून हालचालींना वेळ

railway
railway sakaln
Updated on

Uran Railway: उरणपासून खारकोपरपर्यंत धावणाऱ्या लोकलच्या कामांचा आढावा मध्य रेल्वेच्या उप-व्यवस्थापकांनी आठवड्यापूर्वी घेतला होता. यामुळे उरणकरांच्या सुखकर प्रवासाच्या दृष्टीने अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली उरण रेल्वे धावणार असल्याच्या शक्यतेला बळ मिळाले होते, पण रेल्वे प्रशासनाने अद्यापही उद्घाटनाची ठोस तारीख दिली नसल्याने प्रशासनाकडून उरणकरांच्या भावनांशी सुरू असलेल्या खेळखंडोबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे.


उरण रेल्वेच्या लोकार्पणासाठी तारखांवर तारीख मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. एकीकडे उरण परिसरात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उरण परिसरात कंटेनर यार्ड, गोडाऊन वाढल्याने मुंबई, नवी मुंबई, पनवेल शहरातील कित्येक नागरिक रोजगाराच्या शोधात उरण परिसरात येत आहेत. तसेच शहरातून बहुसंख्य नागरिक, विद्यार्थी शिक्षण व रोजगारासाठी मुंबई, नवी मुंबईत दररोज प्रवास करत असल्याने उपलब्ध प्रवासी सेवा तोकडी पडत आहे. अशातच मध्य रेल्वेचे उपव्यवस्थापक रजनीश गोयल यांनी नुकतीच उरण रेल्वे दरम्यान असणाऱ्या पाच रेल्वे स्थानकांची पाहणी केली होती.

railway
Uran News : उरणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रांची दुरवस्था; सरकारचे दुर्लक्ष

यावेळी स्थानकातील सुविधांचा, तसेच उर्वरित कामांचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे प्रवासाच्या दृष्टीने उरणची रेल्वे धावणार, अशी आशा पल्लवित झाली असतानाच लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. त्यामुळे उरण रेल्वेच्या उद्घाटनाला होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांमधील नाराजी वाढतच आहे.

नामांतराचा प्रश्नही अधांतरी
खारकोपर ते उरण स्थानकांदरम्यान असणाऱ्या गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी या स्थानकांपैकी धुतूम गावाच्या हद्दीत येणाऱ्या स्थानकाला रांजण पाडा, नवघर गावाच्या हद्दीत येणाऱ्या स्थानकाला न्हावा-शेवा, तर बोकडवीरा गावाच्या हद्दीत येणाऱ्या स्थानकाला द्रोणागिरी हे नाव दिल्याने स्थानिकांनी मूळ गावांची नावे देण्यात यावीत, यासाठी आंदोलने केली आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने नामांतराचा प्रश्न देखील अधांतरीच ठेवल्याने उरणकरांनी तीव्र आंदोलनाची तयारी केली आहे.

नवघरच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वेस्थानकाला न्हावा-शेवा हे नाव दिले आहे. मात्र, आमच्या मूळ गावठाणांची नावे द्यावीत, अन्यथा आम्ही स्थानिक ग्रामस्थ मिळून रेल्वे प्रशासनाला उद्घाटनाच्या दिवशीच काळे झेंडे दाखवून त्यांचे स्वागत करणार आहोत.
- प्रा. एल. बी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते


वृत्तपत्रांत विविध तारखेला उरण रेल्वेचे उद्घाटन होणार, असे वाचतो. मात्र, तारखेवर तारीख मिळत असल्याने प्रचंड भ्रमनिरास होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने शक्यतितक्या लवकर उरण रेल्वे सुरू करावी.
- संतोष पाटील, स्थानिक

railway
Railway News: प्रशासनाची कळकळीची विनंती, लोकलचं काम महत्वाचं आहे कृपया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()