अभिनेत्रीचा मास्क काढून शिवसैनिक उर्मिला यांचा योगी आदित्यनाथ यांना "जय महाराष्ट्र"; मातोंडकर ऍक्शन मोडमध्ये

अभिनेत्रीचा मास्क काढून शिवसैनिक उर्मिला यांचा योगी आदित्यनाथ यांना "जय महाराष्ट्र"; मातोंडकर ऍक्शन मोडमध्ये
Updated on

मुंबई : काल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर आज उर्मिला मातोंडकर थेट ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळाल्या. उर्मिला यांनी आई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन मुंबईतून आपल्या कामाला सुरवात केली आहे. काही आज उर्मिला मातोंडकर या शिवसेना भवनामध्ये दाखल झाल्यात. शिवसेना भवनात दाखल झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी आई तुळजाभवानीच्या प्रतिमेला नमन केलं आणि उर्मिला मातोंडकर यांनी कामाला आपल्या कामाला सुरवात केली आहे.

उर्मिला मातोंडकर यांची प्रतिक्रिया : 

आज सेना भवनात प्रवेश करताना ऐतिहासिक दिवस असल्यासारखं वाटत आहे. माझ्या आयुष्याचा काही काळ मी शिवाजी मंदिर आणि जवळच्याच रुपारेल कॉलेजमध्ये घालवला आहे. त्यावेळेस सेना भवनात येण्याचा योग आला नाही. मात्र आज सेना भवनात येताना खूप सुंदर वाटतंय. आज एकच खंत वाटतेय की माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. ते आज असते तर त्यांच्या पाया पडून आज पुढील वाटचालीची सुरवात करायला आवडलं असतं. उर्मिला मातोंडकर आज सेना भवनात येणं हे छोटं पाऊल आहे, पुढे आणखी मोठा रस्ता आहे, असं देखील मातोंडकर यावेळी म्हणाल्या आहेत.  

मुंबई महापालिकांबद्दल उर्मिला म्हणतात : 

मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही वर्षभर दूर आहे. अशात केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामं केली जाऊ नये. कामं कायम सुरु ठेवली पाहिजेत आणि शिवसैनिक ती कायम करत राहतात. कोविडकाळात काही शिवसैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याबाबत शिवसैनिक जास्त वाच्यता करत नाहीत. काम करत राहतात.

अभिनेत्रीचा मास्ककाढून योगींना उत्तर : 

अभिनेत्री म्हणून प्रतिकिया देण्याचे दिवस गेलेत, आज योगी आदित्यनाथ यांना एक शिवसैनिक म्हणून प्रतिक्रिया देते. योगी यांनी यावं जरूर, त्यांना माझा जय महाराष्ट्र ! महाराष्ट्राचं हृदय खूप मोठं आहे. महाराष्ट्र अनेकांना आपल्या हृदयात सामावून घेऊ शकतो. हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे केवळ दोन चार लोकं नव्हेत तर ही मोठी इंडस्ट्री आहे. दादासाहेब फाळके आणि व्ही शांताराम यांच्या काळात मराठी मातीत जन्मलेली ही इंडस्ट्री आहे. मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीचे खूप घट्ट रक्ताचं नातं आहे. ते नातं एका दिवसात आणि काही महिन्यात बनणारे नाही आहे. त्यांचं स्वागतच आहे. आरे ला कारे करायची वेळ येईल तेंव्हा काय करायचं ते पाहिलं जाईल.  

urmila matondkar in action mode replies to yogi aadityanath over shifting bollywood to UP

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.