"जागा आणि वेळ तुम्ही ठरवा, सर्व कागदपत्रे घेऊन मी येते"; उर्मिला मातोंडकर आणि कंगनात ट्विटर वॉर
मुंबई, ता. 4 : शिवसेना नेत्या आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात काही दिवसांपासून जोराचे खटके उडत आहेत. आता पुन्हा एकदा कंगनाने राणावतने उर्मिलास तिच्या महागड्या नवीन कार्यालयावरुन निशाणा साधत सवाल उपस्थित केले आहेत. तर, उर्मिलाने कंगनाचे हे सवाल तितकेच सडेतोड उत्तर देत भिरकावून लावले आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी खार येथे नवे कार्यालय खरेदी केले आहे. या कार्यालयाची किंमत पावणे चार कोटीच्या आसपास आहे. यावरुनच कंगनाने पुन्हा एकदा उर्मिलास समाज माध्यमावर डिवचण्याचा मोका साधला आहे.
उर्मिलाला डिवचताना कंगनाने म्हटले आहे की...
'भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही. पण उर्मिला यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झाला. उर्मिलाजी मी स्वतःच्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस माझे घर तोडत आहे. शिवाय, भाजपला खूष करुन माझ्या हातात फक्त 25 ते 30 न्यायालयीन दावे पडले. मी तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रेसला खुष केले असते. असा टोला मारावयासही कंगनाने कमी केला नाही.
महत्त्वाची बातमी : टाळेबंदीत अपघात घटले, मृत्यू वाढले! नऊ महिन्यांत दहा हजार जणांचा मृत्यू
उर्मिला मातोंडकरने कंगनाच्या या तिखट टिकेला तितकेच खडे बोल सुनावले आहेत. उर्मिला यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत कंगनाला प्रत्युत्तर दिले आहे. त्यात त्या म्हणतात की, 'कंगनाजी, माझ्या बाबतीतचे तुमचे विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशाने ऐकले आहेत. संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्रे घेऊन मी येते. या कागदपत्रांमध्ये 2011मध्ये स्वतःच्या मेहनतीने अंधेरीत सदनिका विकत घेतल्याचा पुरावा मिळेल.
या पुढे त्या म्हणतात की, '30 - 30 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ही संपत्ती विकत घेतली होती. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मार्च 2020 मध्ये टाळेबदीच्या पूर्वी ती सदनिका विकल्याची कागदपत्रे आणि पुरावे आहेत. त्याच पैशातून मी विकत घेतलेल्या नव्या कार्यालयाची कागदपत्रे आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून कार्यालय विकत घेतले आहे, हेही मी दाखवेन,' असा खुलासा उर्मिलाने केला आहे.
उर्मिला मार्तोंडकर यांनी खार येथे इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कार्यालय खरेदी केले आहे. ते 1040 चौरस फुटांचे आहे. या जागेचा दर 36 हजार प्रति चौरस फूट असून 28 डिसेंबरला हा व्यवहार झाला. व्यवहारापोटी उर्मिलाने 80,300 रुपये मुद्रांक शुल्क भरले तर नोंदणीसाठी 30 हजार रुपये मोजले आहेत.
ऊर्मिला काँग्रेस मधून शिवसेनेत
2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या उर्मिलाचा भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर पक्षांतर्गत मतभेदातून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. अलीकडेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवायच्या 12 उमेदवारांच्या शिफारशित उर्मिला यांच्या नावाचा समावेश आहे.
( संपादन - सुमित बागुल )
urmila matondkar vs kangana ranaut twitter war urmila slammed kangana by sharing video
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.