Mumbai News : रस्ते लवकरच खड्डेमुक्त! पालिकेकडून मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर

खड्डे मुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले.
Mastic Asphalt Technology by mumbai Municipalities
Mastic Asphalt Technology by mumbai MunicipalitiesSakal
Updated on

Mumbai : खड्डे मुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. आता पूर्व व पश्चिम उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी आणखी ३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मास्टिक अस्फाल्टने खड्डे बुजवण्याचे काम पुढील पाच महिन्यांत केले जाणार आहे. या तंत्रज्ञानाने रस्ते मजबूत होतील, असा दावा पालिकेने केला आहे.

Mastic Asphalt Technology by mumbai Municipalities
Mumbai Water Lake Level : मुंबईकरांना दिलासा! 'इतकी' भरली शहराला पाणी पुरवणारी सात धरणं

मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; तरी दरवर्षी पावसाळ्यात परिस्थिची जैसे थे होते. या खड्ड्यांच्या प्रश्नावरून दरवर्षी मुंबई महापालिकेला टीकेचा सामना करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता मुंबईतील सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.

पालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन केले आहे. खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक अस्फाल्ट या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

जानेवारीपर्यंत सुरू राहणार कामे

गेल्या वर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला होता. या वर्षीदेखील या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. सहा मीटरपर्यंत रुंदीच्या रस्त्यांवर कोल्डमिक्स वापरण्यात येणार असून त्याहून मोठ्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी रिॲक्टिव्ह अस्फाल्ट आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रीट तसेच मास्टिक अस्फाल्ट वापरण्यात येणार आहे.

खड्डे बुजवण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक अस्फाल्ट वापरले जाणार आहे. पावसाळा आणि पावसाळ्यानंतरही म्हणजे जानेवारीपर्यंत खड्डे बुजवण्याची कामे सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Mastic Asphalt Technology by mumbai Municipalities
Mumbai News : दरडीची दहशत ! अँटॉप हिल टेकडी रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढायची वेळ

येथे करा तक्रार

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी १८००२२१२९३ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला असून २२७ प्रभागांतील अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. तसेच एमसीजीएम २४×७ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शहर

वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लालबाग, परळ, दादर, माहीम, धारावी.

३ कोटी रुपये पूर्व उपनगर

कुर्ला, चेंबूर, गोवंडी.

७ कोटी रुपये

घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, पवई, मुलुंड.

४ कोटी रुपये पश्चिम उपनगर

सांताक्रूझ, वांद्रे, अंधेरी पूर्व.

७ कोटी रुपये

अंधेरी पश्चिम, मालाड, कांदिवली

१० कोटी रुपये

Mastic Asphalt Technology by mumbai Municipalities
Mumbai News : चेंबूरमध्ये पावसाळ्यात रात्रीचे जागरण!

एक किमीच्या रस्त्यांसाठी १६ कोटींचा खर्च

पांजरपोळ येथून येवाई जंक्शनपासून ते येवाई क्लोरिनेशन पाईंटपर्यंतचा सध्या डांबरी रस्ता आहे. हा एक किलोमीटरचा रस्ता सिमेंट क्राँकीटचा करण्यात येणार आहे. यासाठी १५ कोटी खर्च होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.