UTS App : युटीएस ॲप सुसाट; मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांची पसंती; मध्य रेल्वेला २२.१८ कोटीचा महसूल !

२.०७ कोटी प्रवाशांनी युटीएस ॲपचा केला वापर !
UTS Mobile App preferred by passengers 22 crore revenue to Central Railway
UTS Mobile App preferred by passengers 22 crore revenue to Central Railway sakal
Updated on

Mumbai News : रेल्वेचा तिकिट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करुन दिला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी युटीएस अ‍ॅप सतत अद्यावत करण्यात आल्याने मोबाईल तिकिटांची विक्री मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात २.०७ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाइल अॅपचा वापर केला आहे. ज्यामधून मध्य रेल्वेला २२.१८ कोटीचा महसूल मिळाला आहे.

उपनगरीय प्रवाशांची मागणी आणि आवश्यकता समजून घेऊन मध्य रेल्वेवर डिजिटल तिकीट निवडण्यासाठी अधिकाधिक मुंबई उपनगरीय प्रवाशांना आकर्षित केले आहे. १९ जानेवारी २०२३ पासून, युटीएस ॲपवर फर्स्ट क्लास आणि एसी लोकलमधील प्रवासासाठी एका तिकिटावर ४ प्रवाशांपर्यंत बुकिंग करण्यासाठी सक्षम केले आहे.

त्यामुळे प्रवाशांनी मोबाईल तिकिटाकडे आपला कल वाढविला आहे. तसेच आता चुकीच्या पासवर्डमुळे मुंबई विभागाने अॅप लॉक होण्याची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांवर आणली. तसेच इतर काही बदल केले आहे. त्यामुळे मोबाईल तिकिटांची विक्री मोठी वाढ झाली आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये मध्य रेल्वेच्या पाचही विभागात २.०७ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाइल अॅपचा वापर केला. ज्यामधून २२.१८ कोटीची कमाई केली. एकट्या मुंबई विभागात २.०२ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाईल अॅप वापर केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

युटीएस अ‍ॅप सतत अद्यावत !

चुकीच्या पासवर्डमुळे मुंबई विभागाने अॅप लॉक होण्याची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांवर आणली. यूटीएस अॅप आणि पेमेंट अॅप दरम्यान टॉगल न करता थेट यूपीआय मोडद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय प्रदान करून पेमेंट प्रक्रिया सुलभ केली.

पूर्वी स्रोत स्थानकापासून यूटीएस तिकीट बुक करण्याची बाह्य मर्यादा उपनगरीय स्थानकांसाठी २ किमी आणि उपनगरी नसलेल्या स्थानकासाठी ५ किमी होती. आता ते अनुक्रमे ५ किमी आणि २० किमी करण्यात आले आहे. मार्च २०२३ पासून यूटीएस अॅप मध्ये किमान ५० रुपयांचे ऑनलाइन मोडद्वारे रिचार्जचे बदल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.