उत्तर प्रदेश मध्ये लसीकरणात अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा; मुंबईत नाहक त्रास

mumbai couple
mumbai couplesakal media
Updated on

मुंबई : कोविशिल्डचा (covishield vaccine) पहिला डोस घेतल्यानंतर 83 दिवसांनी दुसरा डोस (corona second dose) व्यक्तीला दिला जातो, परंतु मुंबईच्या (mumbai couple) सिंह दाम्पत्याला दुसऱ्या डोससाठी 6 महिने थांबावे लागणार आहे. उत्तरप्रदेशमधील (uttar pradesh) लसीकरण केंद्रात नोंदणी (vaccine registration wrong) करणाऱ्या अधिकाऱ्याच्या चुकीची शिक्षा या लाभार्थ्यांना भोगावी लागत आहे.

mumbai couple
दिवा-शीळ रस्ता रुंदीकरणात बाधित होणारे 320 कुटुंब बसले साखळी उपोषणाला

दहिसरचे रहिवासी राम बहादूर सिंह (49) आणि त्यांची पत्नी नीलम सिंह (47)यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस 3 मे 2021 रोजी उत्तरप्रदेशच्या बारागावमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात घेतला. त्यानंतर, हे कुटुंब मुंबईला परतले. 83 दिवसांनंतर, जेव्हा हे जोडपं दुसरा डोस घेण्यासाठी गेले, तेव्हा दहिसर लसीकरण केंद्राच्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की त्यांच्या पहिल्या लसीचा कालावधी अद्याप संपलेला नाही, कारण, सिस्टममध्ये पहिला डोस घेण्याची तारीख 22 जुलै 2021 नोंद करण्यात आली आहे. या जोडप्याने पहिला डोस घेतलेले प्रमाणपत्रही तिथल्या अधिकाऱ्याला दाखवले, परंतु अधिकाऱ्याने सांगितले की सिस्टममध्ये जुलैची तारीख दाखवत आहे, त्यामुळे त्यांना लस न घेताच परतावे लागले. आता त्यांना आणखी 3 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राम बहादूर यांनी सांगितले की मला मधुमेह आणि न्यूरोलॉजी संबंधित समस्या आहे. कामासाठी चर्चगेटला जावे लागते. जर मला आता दुसरा डोस मिळाला असता तर मला कोरोनापासून सुरक्षा मिळाली असती आणि कार्यालयात जाण्यासाठी  पासही मिळाला असता. या संदर्भात, केंद्राच्या नोंदणी अधिकारी अनिता प्रकाश यांच्याशी बोलले असता, त्यांनी प्रश्न ऐकल्यानंतर मौन बाळगले.

mumbai couple
स्मार्टफोनने देखील करता येते प्रोफेशनल फोटोग्राफी, वापरुन पाहा या ट्रिक्स

उत्तरप्रदेश केंद्र अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा

खरं तर, या जोडप्याला 3 मे रोजी लसीकरण करण्यात आले होते, परंतु त्यावेळी त्यांचा तपशील नोंदणीसाठी घेण्यात आला होता, परंतु अधिकाऱ्यांनी त्वरित नोंदणी केली नाही. मुंबईत आल्यानंतर राम बहादूरने त्या अधिकाऱ्याला नोंदणीसंदर्भात फोनही केला, पण अधिकारी इतकी निष्काळजी होती की त्यांची नोंदणी केलीच नाही. अनेक कॉल केल्यानंतर, त्या अधिकारी महिलेने 22 जुलैची नोंदणी केली. हेच कारण आहे की दुसरा डोस, जो जुलैमध्ये मिळणार होता तो आता त्यांना थेट नोव्हेंबरमध्ये मिळेल.

प्रतिक्षा करावी लागेल

लसीकरण ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. आता ज्याप्रकारे सिस्टममध्ये नोंद झाली असेल त्याच्या 83 दिवसांनंतरच सिस्टम दुसरा डोस  स्वीकारेल. आम्ही सध्या त्याबद्दल काहीही करू शकत नाही. लोकांना विनंती आहे जर लोक पहिला डोस गावात किंवा कुठेही घेत असतील तर लक्षात ठेवा की त्यांची नोंदणी त्वरित केली पाहिजे अन्यथा त्यांना भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.