ठाण्यातील सभेत राज ठाकरेंचं 'लाव रे ते व्हिडिओ'; दाखवले 'ते' तीन व्हिडिओ

राज ठाकरेंकडून ठाण्यात मनसेच्यावतीनं आयोजित उत्तर सभेत जोरदार फटकेबाजी
Raj Thackeray
Raj ThackerayRaj Thackeray
Updated on

मुंबई : राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडिओ'चं प्रात्यक्षित दाखवलं. यावेळी त्यांनी यापूर्वी मांडलेल्या आपल्या भूमिकेचे तीन व्हिडिओ दाखवले. यावरुन त्यांनी राज्य सरकारला सवाल विचारले. मनसेच्या पाडवा मेळाव्यातील भूमिकेवरुन राज ठाकरेंवर टीका झाल्यानंतर त्यांनी या टिकेला ठाण्यातील सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Uttar Sabha in Thane Raj Thackeray showed that three videos)

Raj Thackeray
"मोदींनी 'या' दोन मागण्या पूर्ण कराव्यात देशावर उपकार होतील"

सभेतील भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी स्वतःच्या विधानांचे तीन व्हिडिओ खास उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी लावले. यामध्ये त्यांनी मशिंदींवरील भोग्यांबाबत भूमिका मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी 28 जुलै 2018, 1 ऑगस्ट 2018 आणि 23 जानेवारी 2020 मध्ये त्यांनी केलेल्या भोंग्याबाबत त्यांची भूमिका मांडली.

भुजबळांवर हल्लाबोल

भाषणादरम्यान, राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळं भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता भुजबळ होते, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()