मुंबईकरांची कॉलर एकदम कडक टाईट करणारी बातमी. मुंबईचा 'V-Unbeatable' नावाचा डान्स ग्रुप जगात भारी ठरलाय कारण 'V Unbeatable' या डान्स ग्रुपने 'अमेरिकाज् गॉट टॅलेंट' या अमेरिकेच्या रियॅलिटी शोचं विजेतेपद पटकवलं आहे. त्यामुळे 'V Unbeatable' ग्रुपवर आता जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.
असा होता V-Unbeatable चा प्रवास
अत्यंत गरिब परिस्थितीतून वर येऊन हे यश मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. २०१९ मध्ये 'V Unbeatable' ग्रुप 'अमेरिकाज् गॉट टॅलेंट'मध्ये सहभागी झाला होता. मात्र त्यावेळी त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र यावेळी अधिक आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पुन्हा सहभागी होत 'V Unbeatable' ग्रुपनं स्पर्धेच विजेतेपद पटकावलं आहे. 'वी अनबीटेबल' मधील बहुतांश डान्सर्स हे मुंबईच्या झोपडपट्टीत राहतात. मात्र परिस्थितीवर मात करत हा ग्रुप इथपर्यंत येऊन पोहोचलाय. याआधी 'वी अनबीटेबल' या ग्रुपनं भारताच्या काही डांस रिअलिटी शो म्हणजेच 'डांस ४ प्लस' आणि 'इंडिया बनेगा मंच'मध्ये सहभाग घेतला होता.
'V Unbeatable' हा ग्रुप ग्रँड फिनालेमध्ये जिंकावा यासाठी बॉलीवूडच्या काही सेलिब्रिटींनी त्यांना आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या सादरीकरणादरम्यान 'V Unbeatable' ग्रुपनं रणवीर सिंह याच्या सिनेमाच्या गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर रणवीर सिंगने यानी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता आणि त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
"मी या ग्रुपला 'अमेरिकाज् गॉट टॅलेंट' च्या फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो, तुम्ही जागतिक मंचावर जे काही कमावलं आहे ते विलक्षण आहे, तुम्ही संपूर्ण भारताचं मन जिंकलं आहे, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा", असं रणवीर सिंग याने आपल्या ट्वीटमधून म्हंटल आहे.
जागतिक दर्जाची स्पर्धा जिंकल्यामुळे भारताची प्रतिमा उंचावली आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर सर्व स्तरातून मुंबईची पोरं V Unbeatable वर कौतुकाचा वर्षाव होतोय. 'V Unbeatable'नेही शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
V unbeatable dance group from Mumbai won Americas got talent
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.