मुंबई : पूर्ण कोरोना लसीकरण (Corona Vaccine)झालेल्यांमध्ये कालांतराने अँटीबॉडीजची कमतरता होऊ लागली आहे. यासाठी आता बुस्टर डोसची आवश्यकता भासू लागली आहे. मुंबईतील पूर्ण लसीकरण (Complete vaccination in Mumbai) झालेल्या व्यक्तींमध्ये गेल्या काही महिन्यांत पुन्हा नव्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation)मिळालेल्या आकडेवारीनुसार, 1 फेब्रुवारी ते 8 डिसेंबर दरम्यान पूर्ण लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांमध्ये 19701 संसर्ग झाला होता. तर 4 जानेवारी 2022 पर्यंत ही संख्या 40, 536 वर पोहोचली आहे. याच कालावधीत तुलनेने, एकच डोस झालेल्या व्यक्तींमध्ये 17, 403 वरून 4 जानेवारी 2022 पर्यंत 18,356 पर्यंत वाढ झाली.
अशा प्रकारे, 1 फेब्रुवारी 2021 ते 4 जानेवारी 2022 या 11 महिन्यांच्या कालावधीत एक डोस झालेल्या व्यक्तींमध्ये 0.18 टक्क्यांच्या तुलनेत पूर्ण लसीकरण झालेल्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 0.5 टक्के इतके जास्त होते.1 फेब्रुवारी 2021 ते 4 जानेवारी 2022 या कालावधीत मुंबईत 1.81 कोटी लोकांना कोविड-19 विरूद्ध लसीचा किमान एक डोस देण्यात आला होता, अहवालानुसार, 99,95,739 व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे आणि 81,37,850 लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. यातील अंशतः लसीकरण केलेल्या 18356 किंवा 0.18 टक्के लोकांना कोविड-19 ची लागण झाली आहे. तर 40,536 पूर्ण लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांना संसर्ग झाला असून त्याचे प्रमाण 0.50 टक्के एवढे आहे.नोव्हेंबर महिन्यात कोविडचा आलेख स्थिर झाला होता. तेव्हा 1 फेब्रुवारी ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान, पहिला डोस घेतलेल्या 35,24,653 व्यक्तींपैकी 16,933 जणांना कोविड-19 ची लागण झाली होती. त्या ब्रेक थ्रूचे प्रमाण 0.48 टक्के एवढे होते. तर, पूर्णपणे लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांमध्ये संसर्ग दर 0.30 टक्के होता, कारण, दोन्ही डोस घेतलेल्या 53,83,945 पैकी 15,965 व्यक्तींना संसर्ग झाला होता.
तज्ज्ञांनी या ब्रेक थ्रू संसर्गासाठी दोन प्रमुख निरीक्षणे मांडली आहेत. त्यापैकी एक रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे आणि कोविड 19 संदर्भातील नियम न पाळणे.तज्ज्ञांच्या मते, ज्यांना नुकताच पहिला डोस (नोव्हेंबर 2021-जानेवारी 2022) दरम्यान मिळाला होता, त्यांना अँटीबॉडीचा प्रतिसाद जास्त होता आणि त्यातच ज्यांचे दोन्ही पूर्ण झाले आहेत, अशांमध्ये कमी संसर्ग नोंदला आहे. पण, आता लोकांनीही काळजी आणि सुरक्षा घेणे कमी केले आहे. मास्क न वापरणे, सोशल डिस्टस्टिंग न पाळणे, एकत्र जमा होणे, गर्दी करणे या सर्व गोष्टी सर्रास होतात. त्यातूनही हे प्रमाण वाढले असेल. याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, यातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या आकडेवारीत तिसर्या लाटेतील नवीन संसर्गांची नोंदणी झाली आहे. याशिवाय, नऊ महिन्यांच्या लसीकरणानंतर लसींमधील अँटीबॉडीज कमकुवत होऊ लागल्यानेही असे होऊ शकते.
अनेकांना 8 ते 10 महिन्यांपूर्वी लसीकरण करण्यात आले आहे. आता त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली असावी, ज्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे, बूस्टर डोसची मागणी वाढली आहे, मात्र, दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाच्या ब्रेक थ्रुचा संसर्गाचा धोका कमी आहे. याचा अर्थ कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. कोविड सह इतर कोणत्याही व्हायरसपासून कोणतीच लस 100 टक्के सुरक्षा देऊ शकत नाही, असेही काकाणी म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.