Latest Vashi News कमी पैशात पोटाची भूक भागवणारा सर्वांच्या पंसतीस उतरलेला वडापाव महाग झाल्याने खवय्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अगदी १५ रुपयांना येणारा वडापाव चक्क २० ते २५ रुपयांवर पोहोचला आहे.
मागील तीन महिन्यापासून तेलांच्या व सिलिंडरच्या भावात वाढ झाल्याने त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवरही झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील नामांकित खाद्यविक्रेत्यांच्या दुकानातील वडापावचे दर पाच ते सात रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. तर गाडीवर मिळणाऱ्या वडापावचे दरही दोन ते तीन रुपयांनी वाढवण्यात आल्याचे चित्र आहे.