Vadhavan Port Ceremony PM Narendra Modi Maharashtra Palghar Visit
पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर येथे वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी शुक्रवारी (ता. ३०) येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेची जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळील सिडको मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला ६० हजार नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असून पावसाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमाच्या वेळी कोणतीही वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये, याकरिता आज (गुरुवारी,ता. २९) आणि शुक्रवारी (ता. ३०) मुंबई-अहमदाबाद मार्गावरून सर्व अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेश बंदी करण्यात आली आहे.