मनोर, (जि. पालघर) - ‘आजचा (ता. ३०) दिवस देश आणि महाराष्ट्र राज्यासाठी ऐतिहासिक दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणारे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर जगातील दहा बंदरांपैकी एक ठरेल,’ असा आशावाद केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला. बंदर निर्मितीमुळे देशाला वेगळी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.