Valentine's Day: व्हॅलेंटाईन आला तरी गुलाबाची कळी खुलेना; मनासारखा भाव मिळेना

डिजिटल प्रेमाचा फुल बाजारावर परिणाम; गुलाबाच्या दरात घसरण
Valentine's Day: व्हॅलेंटाईन आला तरी गुलाबाची कळी खुलेना; मनासारखा भाव मिळेना
Updated on

नितीन बिनेकर

व्हॅलेंटाईन डे आणि गुलाब यांचे वर्षानुवर्षाचे अतूट नाते. याच नात्याला गेल्या चार-पाच वर्षांपासून सोशल मीडियाची काहीशी नजर लागली आहे. पूर्वीप्रमाणेच आजही तरूणाई उत्स्फूर्तपणे व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, मात्र त्यामध्ये काहीसा बदल झाला असून ते खरेखुरे गुलाब मैत्रिणीला किंवा मित्राला भेट न देता स्वस्तात मस्त म्हणत व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरूनच नकली गुलाबाची भेट म्हणून पाठवत आहेत.

त्याचा थेट फटका फुल विक्रेत्यांसह उत्पादकांना बसला असून दोन दिवसांवर व्हॅलेंटाईन डे आला तरी गुलाबाला फारशी मागणीच नाही. त्यामुळे 'गुलाबाची' कळी खुलता खुलेना, मनासारखा दर मिळेना असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पुढील दोन दिवस असाच पडलेला बाजार राहिला तर व्यवसाय करायचा कसा या चिंतेने विक्रेत्यांसह उत्पादकांचा चेहरा पडलेला दिसत आहे.

Valentine's Day: व्हॅलेंटाईन आला तरी गुलाबाची कळी खुलेना; मनासारखा भाव मिळेना
Valentines Day 2024 : यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ अविस्मरणीय करायचाय? मग, जोडीदारासोबत ‘या’ बजेट फ्रेंडली ठिकाणांना नक्की द्या भेट

दसरा- दिवाळीत झेंडूच्या फुलांची चलती असते तशीच व्हॅलेन्टाईन डेला गुलाबाची चलती असते. वर्षातून एक दिवस मोठी मोजणी असली तरी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात गुलाबाचे उत्पादन घेत आहेत. कोरोना महामारीच्या आधी गुलाबाची एक जुडी २५०-३०० रुपयांना मिळत होती. मात्र त्याचा दर आता १५०-१८० रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे आधुनिक काळात गुलाबाची शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजार पेठेत गुलाबाजी आवक वाढली आहे. त्यामुळे सुद्धा गुलाबाचे दर कमी झाल्याची माहिती दादर मधील फुल व्यापाऱ्यांनी 'सकाळ'ला दिली.

व्हॅलेंटाइन वीकमुळे गुलाब फुलांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनीही गुलाबाची आवक वाढली आहे. सद्यःस्थितीत दादर फुल बाजारात गुलाबाच्या आकार आणि रंगानुसार २० -२५ फुलांची पेंडी १८० ते ५० रुपयांपासून गुलाबाची विक्री होत आहे. विशेष म्हणजे, दादरला फुलांचा ठोक बाजार पहाटे ४ वाजता सुरु होतोय. सकाळी ८ वाजेपर्यत संपतोय. यादरम्यान बाजार सुरु होतो तेव्हा फुलांचे दर महाग असते त्यानंतर हळूहळू गुलाबजाचेही दर कमी होते. मागील काही दिवसांच्या तुलनेत ठोक बाजारात गुलाबाचे दर २० टक्क्यांनी वाढल्याचे सकाळला व्यापाऱ्यांनी सांगितले.

Valentine's Day: व्हॅलेंटाईन आला तरी गुलाबाची कळी खुलेना; मनासारखा भाव मिळेना
Valentines Day 2024 : मी काश्मीर तर ती कन्याकुमारी, मग कसं टिकेल आमचं नातं?

गुलाबाचे वेड पूर्वी सारखे नाही

भारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत गुलाबाचा प्रथम क्रमांक लागतो. दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अत्युच्च प्रतीच्या गुलाबाची निर्मिती होते. मात्र,आता देशासह महाराष्ट्र्रात गुलाब फुलांची लागवड वाढली आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमधून मोठ्या प्रमाणात गुलाब फुलाची शेती केली जाते. त्यामुळे दादर बाजारात गुलाब फुलांची आवक वाढली आहे. त्यातच आता तरुणींमध्ये गुलाबाचे वेड पूर्वी सारखे राहिलेले नसल्याची माहिती दादरमधील गुलाब फुल व्यापारी यांनी सकाळला दिली.

पूर्वी प्रमाणे व्हॅलेंटाईन डे' वीक गुलाब फुलांचा व्यवसाय राहिलेला नाहीत. कधी फुलांचे भाव वाढते तर कधी बाजारात फुलांची आवक वाढल्यास भाव पडतोय. सध्या व्हॅलेंटाईन डे' वीकमध्ये गुलाबाच्या जुडीचे दर आज १८० ते ५० रुपयांपर्यत आहे.

संतोष जाधव, व्यापारी

Valentine's Day: व्हॅलेंटाईन आला तरी गुलाबाची कळी खुलेना; मनासारखा भाव मिळेना
Valentines Day 2024 :'व्हॅलेंटाईन डे' च्या नाईट डेटला परफेक्ट दिसायचय? मग,स्टायलिंग करताना अशी घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.