सीएसएमटी - जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला शनिवारी बैलांनी धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून सव्वा तास वंदे भारत एक्सप्रेसच्या खोळंबा झाला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नवीन पिढीच्या सीएसएमटी- जालना हायस्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसच्या शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता अपघात झाला. वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईहून जालना येत होत
यादरम्यान लासुर येथे बैलांच्या कळप रेल्वे मार्गावर आला. यादरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची जोरदार धडक झाली. या धडकीत बैलाचा जागीच मृत्यू झाला. मात्र मोटरमनने लगेच ब्रेक दाबून गाडी थांबविब्यात आली. असून गाडीचा दर्शनी भाग चेपला आहे. तसेच काही भाग तुटला आहे. या अपघातामुळे गाडीचा मोठे नुकसना झाले आहे. या घटनेमुळे वंदे भारत ट्रेनला पाऊण तास खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०२३ रोजी जालना ते सीएसएमटी दरम्यान अत्याधुनिक - हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून सुरू केली होती. वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू झाल्यापासून प्रथमच अपघात झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.