Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनची अवघ्या १४ मिनिटात स्वच्छता!

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय रेल्वेने रविवारी प्रथमच अशी ऐतिहासिक कामगिरी
Vande Bharat Train
Vande Bharat TrainSakal
Updated on

मुंबई : सोलापूर - मुंबई, मुंबई - साईनगर शिर्डी आणि बिलासपूर - नागपूर वंदे भारत ट्रेनसह देशभरातील सर्व वंदे भारत ट्रेनचे अवघ्या १४ मिनिटात विक्रमी वेळेत स्वच्छता करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय रेल्वेने रविवारी प्रथमच अशी ऐतिहासिक कामगिरी केली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

रविवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडिओ लिंकद्वारे स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून अवघ्या १४ मिनिटात देशभरातील सर्व वंदे भारत ट्रेनची स्वच्छता करण्यात आली आहे.

अशी कामगिरी भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्या एकाच वेळी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ करण्यात आल्या.

Vande Bharat Train
Vande Bharat Train : देशातील ११ राज्यांना मिळालं मोठं गिफ्ट! PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भारत ट्रेन

सर्व झोनचे महाव्यवस्थापक, सर्व विभागांचे विभागीय व्यवस्थापक, विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी आपापल्या परिमंडळ/विभागातील कार्यक्रमास उपस्थित होते. मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या रेकच्या दर्जेदार साफसफाईसाठी नवीन “१४ मिनिटांचा चमत्कार” योजना स्वीकारली आहे. ही नवीन योजना १ आक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.

सोलापूर - सीएसएमटी- सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस करीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, सीएसएमटी- साईनगर शिर्डी- सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस करीता साईनगर शिर्डी येथे आणि बिलासपूर - नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस करीता नागपूर स्थानकावर येथे स्वछता करण्यात आलेल्या आहे.

Vande Bharat Train
Mumbai Toll rate Hike: आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला! मुंबईकरांना वाढीव टोलचा भुर्दंड

सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर ट्रेन आल्यानंतर आणि सर्व प्रवासी उतरल्याची खात्री केल्यानंतर दुपारी १२.४२ वाजता साफसफाईची कारवाई सुरू झाली. १२. ४२ ते १२.५६ वाजता विक्रमी १४ मिनिटांत पूर्ण झाले. या स्वच्छते मोहीम मध्ये ४४ सफाई कर्मचार्‍यांची ए, बी आणि सी अशी टीम नियुक्त केली होती. स्वच्छतागृहे, रॅक, पटल, आसन, फ्लोरींग आणि कोचच्या बाहेरील भागांसह आतील भागांची सखोल साफसफाई करण्यात आली आहे.

शौचालयात पॅन सीट, काच इत्यादी साफ करण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यात आला. हे सर्व स्वछ्तेचे काम अवघ्या १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत केले आहे. ज्यामध्ये २ मिनिटे बॅगमध्ये कचरा गोळा करण्यासाठी, ३ मिनिटे सीट आणि स्नॅक टेबल साफ करण्यासाठी, ३ मिनिटे पॅनेल आणि कोच साफ करण्यासाठी आणि ६ मिनिटे कोच फ्लोअरिंगच्या साफसफाईसाठी लागले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.