कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?
Updated on

मुंबई - कोरोना व्हायरस जास्त उष्णतेत खरंच मरतो का? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. कारण काही तज्ज्ञांनी तसा दावा केलाय. कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस? वातावरण ठरवतं का कोरोना व्हायरसचं अस्तित्व? कोणतं वातावरण रोखू शकतं कोरोना व्हायरसला? असे प्रश्न अनेकांना पडलेत. त्यामुळे खरंच जास्त तापमानात कोरोना टिकू शकतो का याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.  

जगाच्या जीवाशी खेळ मांडणाऱ्या कोरोना व्हायरसवर अनेक तर्क-वितर्क लढवले जातायत. नेमका कशावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतोय. त्यातच आता काही तज्ज्ञांनी उष्ण वातावरणात कोरोना व्हायरस निष्क्रिय होतो असा कयास लावलाय. पण त्यासाठी तापमान 38 ते 40 डिग्री असायला हवं असंही सांगितलं जातंय.

सर्वसाधारणपणे कोणत्याही आजाराचा विषाणू जास्त तापमानात मरण्याची शक्यता जास्त असते, याच समीकरणाचा आधार घेत काही शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसबाबतही हा अंदाज वर्तवलाय. त्यामुळेच थंड हवेत कोरोनाचे विषाणू जास्त परसण्याची भीतीही व्यक्त होतेय. नेमकं काय खरं आणि काय खोटं हे तो कोरोना विषाणूच जाणो. पण कोरोनापासून बचावासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना करत काळजी घेणं येवढंच आपल्या हाती आहे. कारण काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली कधीही बरी.

जाणून घ्या 'कधी येणार' कोरोनावरील लस

जगभरातील संशोधकांकडून कोरोनावर औषध आणि लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशात वैद्यकीय विभागातील माहितीनुसार कोरोनावर लस येण्यास आणखी १८ महिने लागणार असल्याचं बोललं जातंय. अमेरिकेत आजपासून कोरोना व्हायरसवरील लसीवर चाचणी सुरु होणार आहे. एकूण ४५ निरोगी नागरिकांवर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे.  या लसीच्या चाचणीतून कोरोना लसीच्या दुष्परिणामांची माहिती घेतली जाणार आहे. यावर अभ्यास करून कोरोनावरील लस अधिक उपायकारक कशी होईल यावर संशोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनावरील लस येण्यासाठी आणखीन १८ महिने लागणार असल्याचं समजतंय. 

various weather and its effect on covid 19 corona virus read full report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.