Varsha Gaikwad: महाविकास आघाडीत उत्तम समन्वय; मुंबईतून आघाडीचे सहा खासदार दिल्लीला पाठवू

टिळक भवन व शिवसेना भवनमध्ये काँग्रेस, शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा
Varsha Gaikwad: महाविकास आघाडीत उत्तम समन्वय; मुंबईतून आघाडीचे सहा खासदार दिल्लीला पाठवू
Varsha Gaikwadsakal
Updated on

Mumbai News: टिळक भवन आणि शिवसेना भवनमध्ये काँग्रेस, शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसभेची ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून महाविकास आघाडीसाठी मुंबई व महाराष्ट्रात चांगले वातावरण आहे, महाविकास आघाडीत उत्तम समन्वय असून

मुंबईतून आघाडीचे सहा खासदार दिल्लीला पाठवू , असा विश्वास उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना मेळाव्यात व्यक्त केला

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी शिवसेना भवन येथे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच नायगांव वडाळा विधासभेतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा टिळक भवन येथे मेळावा पार पडला.

शिवसेना भवनतील मेळाव्यात वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील धारावी, चेंबूर, अणुशक्तीनगर, वडाळा या सर्वच भागातून कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे कामाला लागले आहेत. मुंबई काँग्रेसची अध्यक्ष नात्याने या मतदारसंघातून मोठी ताकद उभी करु तसेच इतर सहा मतदारसंघातही काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर मित्रपक्षांसोबत एकदिलाने काम करतील. देशावरच्या संकटाची जाणीव आपल्या सर्वांना आहे. लोकशाही व संविधान वाचवण्याच्य़ा या लढाईत आपले सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी काम करावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

लोकसभेची ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून महाविकास आघाडीसाठी मुंबई व महाराष्ट्रात चांगले वातावरण आहे, लोकांचा प्रतिसाद चांगला. आघाडीचे उमेदवार देसाई यांच्यासाठी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करतील. मुंबईच्या सर्व मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय असून मुंबईतून मविआचे सहा खासदार दिल्लीला पाठवू, असा निर्धार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com