Vasai Accident: वसईत पोहायला गेलेले दोन मुलं तलावात बुडाली, तर तीन जण बेपत्ता

Mumbai : विद्या विकासनी शाळेच्या मागे एका खोलगड खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पोह्याला गेला होता.
Vasai Accident: वसईत पोहायला गेलेले दोन मुलं तलावात बुडाली, तर तीन जण बेपत्ता
Updated on

विजय गायकवाड

Nalasopara: वसईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. तलावात पोहायला गेलेल्या 2 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

तर 3 मुलं मुलं बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानां कडून शोधकार्य सुरू आहे.

जी बेपत्ता मूल आहेत ती बुडाली की घाबरून पळून गेले आहेत याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वालीव चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली आहे.

Vasai Accident: वसईत पोहायला गेलेले दोन मुलं तलावात बुडाली, तर तीन जण बेपत्ता
Water Shortage Vasai : वसईच्या पूर्व पट्टीत भीषण पाणी टंचाई; ७० हजार नागरिकांना होतोय पाच टँकरनी पाणी पुरवठा

अमित शर्मा (वय 13), अभिषेक शर्मा ( वय 14), असे मृतदेह मिळालेल्या मुलांची नाव आहेत.

तर ढोलू गुप्ता (वय 16,), कृष्णा गुप्ता (वय 10) आणि तिसऱ्याच नाव कळालं नाही. हे सर्वजण नालासोपारा पूर्व संतोषभूवन परिसरातील राहणारे आहेत. वसई पूर्वेच्या हवाईपाडा येथील फादरवाडी या परिसरात आज शनिवार ता 15 रोजी दुपारी सव्वा एक वाजता पाच जणांचा ग्रुप मुंबई दिल्ली कॅरीडोअरचा बाजूला विद्या विकासनी शाळेच्या मागे एका खोलगड खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पोह्याला गेला होता.

Vasai Accident: वसईत पोहायला गेलेले दोन मुलं तलावात बुडाली, तर तीन जण बेपत्ता
Vasai News: २५ दिवसानंतर अखेर 'त्या' बिबट्याला जेरबंद करण्यात आले यश; वसईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोन मुलं बुडाली . दोन मुलांना स्थानिकांनी बाहेर काढलं. ते मयत झाली आहेत. आता आणखीन तिघे जण बुडाले असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. वसई विरार अग्निशमन विभाग या तिघांचा शोध घेत आहेत. मात्र बेपत्ता मुलं बुडालीत की घाबरून तेथून पळून गेली आहेत याचा पोलीस आता शोध घेत आहेत

Vasai Accident: वसईत पोहायला गेलेले दोन मुलं तलावात बुडाली, तर तीन जण बेपत्ता
Vasai: वसईकरांनो लक्ष द्या, बिबट्याच्या भितीने 'हा' प्रमुख रस्ता सायंकाळी राहणार बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.