विरार - देशात आणि राज्यात आपला विजय रथाची घोडदौड करणाऱ्या भाजपची वसईमध्ये मात्र पाटी कोरी राहिली आहे. यावेळी पहिल्यांदा महायुती मधून भाजप वसईमध्ये आपले नशीब अजमावत आहे..देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आणि खासदार निवडून आणणाऱ्या भाजपाला वसईमध्ये मात्र अजून आपले खाते उघडता आले नाही. यापूर्वी युतीमध्ये या ठिकाणाहून एकत्रित शिवसेना निवडणूक लढवत आली आहे. यावेळी मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदा भाजप वसईची जागा लढवत आहे. त्यामुळे भाजप आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे..ही लढाई भाजपसाठी पाहिजे तेवढी सोपी नाही. 2009 साली अपक्ष उमेदवार म्हूनू लढणाऱ्या विवेक पंडित यांचे स्टार प्रचारक असलेले विजय पाटील हे यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर भाजपाने विवेक पंडित यांची कन्या स्नेहा दुबे यांना उभे केल्याने येथील निवडणुकीत ट्युस्ट निर्माण झाला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस अशी ही लढाई वसई मध्ये रंगणार आहे..स्नेहा पंडित दुबे याना भाजपने तिकीट दिल्याने भाजपमध्ये नाराजी होती ती नाराजी वरिष्टनी दूर केल्याने नाराज भाजप कार्यकर्ता प्रचारात सक्रिय झाल्याने भाजपला या निवडणुकीत विजयाची चाहूल लागू लागली आहे. त्यामुळे यावेळी वसईवर भाजप आपले खाते उघडते का? याकडे राजकीय निरक्षकांचे लक्ष लागून राहिले. यावेळी पहिल्यांदा वसईमध्ये काटे की बहुजन विकास आघाडी विरोधात काटे की टक्कर बघायला मिळणार आहे..आतापर्यंत वसई मतदार संघ हा काँग्रेस आणि जनता दलाचे बाले किल्ला राहिला होता. परंतु 1990 पासून या ठिकाणी 2009 चा अपवाद वगळता हितेंद्र ठाकूर हे निवडून येत होते. तर 2009 साली शिवसेनेच्या पाठींब्यावर विवेक पंडित हे निवडून आले होते..यापूर्वी युतीत ही जागा शिवसेना सातत्याने लढवत आली होतो. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने ही जागा आता महत्वाची झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्या साठी ही जागा प्रेष्टीज ची झाल्याने याठिकाणी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.