विरार - विधान सभेची निवडणूक जाहीर झाली असून विविध पक्षामध्ये तिकीट वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. यातच महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना राज्यात रंगणार आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास होत आले असतानाच आता वसईमध्ये मात्र आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत असून, वसईची जागा काँग्रेसला सोडल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिववसैनिकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेतल्याने आघाडी पुढे तिढा उभा राहिला आहे.