विरार : वसई विरार शहर महानगरपालिका 'मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल' इमारत भूमिपूजन सोहळा आचोळे येथे तसेच 'नवीन प्रशासकीय इमारत व परिवहन भवन' इमारत उद्घाटन सोहळा, विरार पश्चिम येथे दि.१० जुलै २०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमास खासदार डॉ.हेमंत सवरा, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार .क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील,आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार (भा.प्र.से), महापौर राजीव पाटील, माजी महापौर श्रीमती प्रवीणाताई ठाकूर, माजी महापौर .नारायण मानकर, .रुपेश जाधव, .प्रवीण शेट्टी, परिवहन समिती सभापती कल्पक पाटील,अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच महानगरपालिकेचे माजी सभापती, नगरसेवक, पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, मान्यवर नागरिक, महानगरपालिकेचे सर्व मा.उप-आयुक्त, मा.कार्यकारी अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आचोळे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अपघात विभाग, भांडार कक्ष, अतिदक्षता विभाग, डॉक्टर कक्ष, प्रसूतीगृह, पॅथॉलॉजी, डायलीसीस, फार्मासी विभाग, उपहार गृह इ.विविध सुविधा असणार असून नागरिकांना यामुळे चांगली आरोग्य सुविधा मिळणार आहे.
महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत व परिवहन भवन इमारत ही २५४७५ चौ.मी.क्षेत्रफळ असलेली तळमजला +७ मजली इमारत असून या इमारतीच्या तळमजल्यावर बस सर्विसिंग व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच समोरील मोकळ्या जागेत बस पार्किंग व बस धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या दोन मजल्यांवर परिवहन कार्यालय, वाणिज्य वापरासाठी दुकाने व दुसऱ्या मजल्यावर पार्किंग व्यवस्था (दुचाकी २६३ नग, चारचाकी ७३ नग) करण्यात आली आहे. तसेच ३ ते ७ मजल्यावर प्रशासकीय कार्यालय आहे. यामध्ये १४० सदस्य संख्या असलेले सुसज्ज सर्वसाधारण सभागृह व ६६ आसन क्षमता असलेले स्थायी सभागृह स्थापित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मा.आयुक्त, मा.महापौर यांची दालने, कार्यालये व परिषद सभागृह स्थापित करण्यात आले आहे.
तसेच मा.अतिरिक्त आयुक्त, मा.उप-महापौर, मा.स्थायी समिती सभापती, मा.सभागृह नेता, मा.विरोधी पक्षनेता यांची स्वतंत्र दालने, कार्यालयेही स्थापित करण्यात आली आहेत. याचबरोबर उप-आयुक्तांसाठी स्वतंत्र ११ दालने तयार करण्यात आली असून विविध विभागांसाठी दालनांसह आसन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यावर ऑडीओ व्हिडीओ व्यवस्थेसह बैठकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण प्रशासकीय इमारतीत एकूण ४१५ कर्मचाऱ्यांच्या आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण इमारतीमध्ये मध्यवर्ती वातानुकूलित व्यवस्था करण्यात आलेली असून इमारतीमध्ये उपहारगृहाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.