उत्तरभारतीय मतांवर वसई-विरार जिंकण्याचं शिवसेनेचं लक्ष्य, हितेंद्र ठाकूरांशी सामना

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून उत्तरभारतीय मतदारांची मोर्चे बांधणी सुरू
उत्तरभारतीय मतांवर वसई-विरार जिंकण्याचं शिवसेनेचं लक्ष्य, हितेंद्र ठाकूरांशी सामना
छायाचित्र विजय गायकवाड
Updated on

नालासोपारा: कोरोनाच्या काळात पुढे ढकलण्यात आलेल्या वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचे वेध (Vasai virar corporation election) आता सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला (BVA) टक्कर देण्यासाठी शिवसेनेने (shivsena) उत्तर भारतीय मतदारांना (north indian voters) आकर्षित करण्यासाठी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. वसई नालासोपारा येथील उत्तर भारतीयांचे नेते दिवाकर सिंग आणि नवीन दुबे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पक्ष बांधणीला सुरवात केली असून, वसईच्या भोयदापाडा येथे रविवार ता 25 रोजी नुकतेच एक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून यावर शिक्कामोर्तब केले आहे. (Vasai virar corporation election shivsena try to woo north indian voters dmp82)

शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेलचे उप तालुका प्रमुख विशाल सिंह यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आ रवींद्र फाटक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले आहे. या उद्घाटनासाठी खा राजेंद्र गावित, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, उप जिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, युवा सेना पालघर प्रमुख पंकज देशमुख, जिल्हा महिला संघटक तथा नगरसेविका किरण चेंदवनकर, उप तालुका प्रमुख दिवाकर सिंग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उत्तरभारतीय मतांवर वसई-विरार जिंकण्याचं शिवसेनेचं लक्ष्य, हितेंद्र ठाकूरांशी सामना
मुंबईत आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

वसई विरार महापालिका हद्दीत नालासोपारा आणि वसई पूर्व भागात उत्तरभारतीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संतोषभूवन, बिलालपाडा, गेवराई पाडा, भोयदापाडा, वाग्राल पाडा, ओसवाल नगरी, सेंट्रल पार्क, नगीनदास पाडा, धणीव बाग, नवजीवन, गोखीवरे या परिसरात उत्तरभारतीय मतदारांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. सध्या शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत त्यात दिवाकर सिंग यांच्या पत्नी शिल्पा सिंग ह्या एकमेव उत्तरभारतीय नगरसेवक आहेत.

उत्तरभारतीय मतांवर वसई-विरार जिंकण्याचं शिवसेनेचं लक्ष्य, हितेंद्र ठाकूरांशी सामना
मदतकार्य महत्वाचं, तिथे जाऊन पाहण्यात अर्थ नाही, पूरस्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य

उत्तर भारतीय मतदारांच्या संख्येत नगरसेवक वाढले पाहिजेत हा निश्चय करून, आ रविंद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे बांधणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी बविआला शह देण्यासाठी उत्तर भारतीय मतदार शिवसेनेला किती साथ देतात हे ही तेवढेच महत्वाचे आहे.

महापालिका हद्दीत उत्तर भारतीय मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे. पण सत्ताधारी पक्षाकडून त्यांना योग्य न्याय मिळत नाही. अनेक समस्या आहेत त्या सोडविल्या जात नाहीत. केवळ त्यांना आश्वासन दिले जातात, अशा सर्व उत्तर भारतीय मतदारांची काम झाली पाहिजेत, त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक प्रभागनिहाय शिवसेनेच्या शाखा निर्माण करून, त्यांना शिवसेनेच्या प्रवाहात आणून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची ताकत दाखविणार आहोत असे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख दिवाकर सिंग यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()