Virar: आ. हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी 70 कोटींचा निधी!

Hirendra Thakur : 70 कोटींचा निधी केवळ वसई-पालघरमधील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी खर्च होणार आहे.
आ. हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी 70 कोटींचा निधी!
Virar hirendra thakur
Updated on

Vasai Virar: कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील तब्बल 11 धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. या कामांसाठी अंदाजित 70 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.

मात्र निवडणुकीनिमित्ताने लागलेल्या आचारसंहितेमुळे या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित आहे, अशी माहिती पालघर जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जुलै 2023 पासून या कामांसाठी प्रत्यक्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पालघर जिल्ह्यातील धूपप्रतिबंधक बंधारे, खार बांध, बहुउद्देशीय निवारा केंद्र व भूमिगत विद्युत वाहिनी अशा तीन कामांसाठी 283 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी अंदाजित 70 कोटींचा निधी केवळ वसई-पालघरमधील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी खर्च होणार आहे.

आ. हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी 70 कोटींचा निधी!
Virar News : वीस रूपयांसाठी पोलिसाने दुकान दाराचे नाक फोडले

वसई तालुक्यातील अर्नाळा, नवापूर, रानगाव, पाचूबंदर ही गावे समुद्रालगत वसलेली आहेत. या परिसरात धूपप्रतिबंधक बंधारे बांधलेले नसल्याने दरवर्षीच्या पासाळ्यात या गावांना उधाणाचा फटका बसतो. दीर्घ पावसात व तुफानादरम्यान समुद्राचे पाणी गावांत शिरत असल्याने आर्थिक व जीवितहानी संभवते. शिवाय उधाणाच्या पाण्याने समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप झालेली आहे. त्यामुळे या गावांना उधाणाच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी समुद्रालगत नव्याने धूपप्रतिबंधक बंधारे तातडीने बांधणे व असलेल्या बंधाऱ्यांचे तातडीने मजबुतीकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा जुलै 2023 रोजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंत्री, बंदरे आणि क्रीडा व युवककल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्याजवळ व्यक्त केली होती.

विशेष म्हणजे जुलै 2022 मध्ये उधाणाच्या पाण्याने नवापूर समुद्रालगत धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने या किनाऱ्यालगतची वाळू खचली होती. समुद्राचे पाणी किनाऱ्यालगतच्या गावांत शिरल्याने नागरिकांच्या घरांचे व शेतीचे अतोनात नुकसान झालेले होते. त्या वेळी नवापूर येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधून मिळावा आणि या कामाला गती मिळावी, यासाठी अर्थसंकल्पात या कामाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी नियोजन समिती आणि पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.

आ. हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी 70 कोटींचा निधी!
Virar Encroachment: विरारमध्ये नाल्यावर अतिक्रमण, पावसाळयात मोठा धोका

दरम्यानच्या काळात फेब्रुवारी 2023 मध्ये पतन अभियांत्रिकी विभागाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातील कामांचे प्रस्ताव प्रथम प्राधान्याने जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजुरीसाठी मागविले होते. यात कोकण आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत प्रथमत: पालघर व रायगड जिल्ह्याला निधीतून वगळण्यात आले होते.

परंतु आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करून पालघर जिल्ह्यातील धूप प्रतिबंधक बंधारे, बहुउद्देशीय निवारा केंद्र तसेच भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी 283 कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता.महत्त्वाचे म्हणजे; वसई तालुक्यातील अर्नाळा, नवापूर, रानगाव, पाचूबंदर या गावांसह पालघर जिल्ह्यातील सातपाटी, डहाणूतील गुंगवाडा, डहाणू गाव, डहाणू आगार, केळवे, नरपड, तडीपाले या गावांतील धूप प्रतिबंधक बंधारेही या निधीतून मार्गी लागणार आहेत.

आ. हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी 70 कोटींचा निधी!
Vasai Murder Case: "पैसे दे अन् मामला रफादफा करू...', वसईतील मुलीच्या हत्येनंतर कुटुंबियांचा पोलिसांवर गंभीर आरोप

प्रस्तावित ठिकाण मंजूर निधी

1) वसई-नवापूर 9.60 कोटी

2) पालघर-सातपाटी 5.00 कोटी

3) वसई-भुईगाव 4.50 कोटी

4) डहाणू-गुंगवाडा 4.10 कोटी

5) वसई-रानगाव 9.10 कोटी

6) डहाणू-डहाणू गाव 6.67 कोटी

7) वसई-पाचूबंदर ते लागेबंदर 6.82 कोटी

8) डहाणू-डहाणू आगार 7.50 कोटी

9) डहाणू-केळवे 8.68 कोटी

10) डहाणू-नरपड 3.75 कोटी

11) वसई-तडियाले  4.28 कोटी

--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com