Vasai Virar: वसई-विरार महापालिकेत 11 पेक्षा जास्त घोटाळे, पंतप्रधान कार्यालयात तक्रार

BJP: विविध योजनांतर्गत वसई-विरार महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे.
वसई-विरार महापालिकेत 11 पेक्षा जास्त घोटाळे, पंतप्रधान कार्यालयात तक्रार
Vasai Virar: sakal
Updated on

Vasai Virar Mahapalika | वसई-विरार महापालिकेतील विविध विभागांमार्फत आतापर्यंत 11 पेक्षा जास्त घोटाळे झालेले आहेत. या विभागांतर्गत काढण्यात आलेल्या कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता आहे. त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे. बहुतांश कामे गरज नसताना काढण्यात आलेली आहेत.

वसई-विरार महापालिकेत 11 पेक्षा जास्त घोटाळे, पंतप्रधान कार्यालयात तक्रार
Vasai Virar: वसई विरारचा पाणी प्रश्न सुटणार, देहेरजेमधून महानगरपालिकेला मिळणार तब्बल इतके पाणी

त्यामुळे ती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्यात कोट्यवधी रुपयांचा अपहार झालेला आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी. त्यात हे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजप वसई अल्पसंख्याक जिल्हा सचिव तसनीफ शेख यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाला भेट दिली. या भेटीत संशयित कामांची यादी सादर करून आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

वसई-विरार महापालिकेत 11 पेक्षा जास्त घोटाळे, पंतप्रधान कार्यालयात तक्रार
Vasai Virar Municipal Corporation: वसई-विरार महापालिका मालमत्ता सर्वेक्षण गैरव्यवहार चव्हाट्यावर!

जून 2020 पासून वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या वेळपासून पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारकडून 15वा वित्त आयोग, स्मार्ट सिटी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्प योजना, पाणीपुरवठा योजना. राष्ट्रीय शुद्ध कार्यक्रम व अन्य विविध योजनांतर्गत वसई-विरार महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे.

या निधीतून वसई-विरार महापालिकेचा सुनियोजित विकास होणे अपेक्षित आहे, परंतु महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने व पालिका अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने पालिकेचा कारभार सद्यस्थितीत अनियंत्रितपणे सुरू आहे. याचे परिणाम म्हणून पालिकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार, गैरव्यवहार होत आहेत.

त्यातून भ्रष्टाचार व घोटाळ्यांना उत्तेजन मिळत आहे. विशेष म्हणजे 2017 पासून वसई-विरार महापालिकेचे लेखापरीक्षणही झालेले नाही, याकडे वसई अल्पसंख्याक जिल्हा सचिव तसनीफ शेख यांनी पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष वेधले आहे.विशेष म्हणजे या निवेदनासोबत त्यांनी वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या काही संशयित कामांची यादीच निवेदनाला जोडलेली आहे. 2020 पासून वसई-विरार महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे.

या काळात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पालिकेला एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी विविध योजनांतर्गत प्राप्त झालेला आहे. शिवाय महापालिकेच्या निधीतूनही अनेक कामे मार्गी लागलेली आहेत. मात्र शहरात झालेल्या बहुतांश कामांत गैरव्यवहार झालेला असल्याचे तसनीफ शेख यांचे म्हणणे आहे. आणि त्यामुळेच या कारभाची चौकशी व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे.

वसई-विरार महापालिकेत 11 पेक्षा जास्त घोटाळे, पंतप्रधान कार्यालयात तक्रार
Vasai Murder Case: मानवी संवेदनशीलतेसमोर गेल्या काही वर्षांपासून पडलेला प्रश्न या बघ्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.