वसई-विरार तहानलेलाच; पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे हाल

योजनांचे काम संथगतीने
water scarcity
water scarcitysakal media
Updated on

वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या (vasai-virar municipal) क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या (Drinking water problem) उद्भवू नये म्हणून प्रशासनातर्फे अमृत पाणी योजनेसारख्या (Amrut pani sheme) इतर उपाययोजनाही राबवल्या जात आहेत; मात्र या योजनांचे काम अत्यंत संथगतीने (scheme work) सुरू असल्यामुळे पाण्याची समस्या निकाली कशी निघणार, असा सवाल नागरीक करित आहेत.

water scarcity
फरार...! परमबीर सिंगाच्या घरावरचा आदेश वाचला का?

वसई विरार शहरात चाळी, बैठी घरे अधिक असल्याने बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी धडपड करावी लागते. अनेक ठिकाणी गळतीच्या ठिकाणी जाऊन पाणी भरण्याची वेळ येते; तर काही ठिकाणी कोसोमैल पायपीट करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेतर्फे अमृत पाणी योजनेंतर्गत नव्या जलवाहिन्या, ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवण्याचे नियोजन आहे; मात्र ही योजना रखडल्याने या योजनेतून पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच मागेल त्याला पाणी योजनेतून नळजोडणी देण्यात आल्याने सामूहिक व सदनिकाधारकांचा आकडा वाढला आहे.

त्यासाठी विरार येथील पापडखिंड धरणालादेखील संजीवनी देण्याची गरजआहे. त्यामुळे शहरासाठी पाण्याचा साठा काही प्रमाणात का होईना वाढेल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे; मात्र याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे वसई विरार शहराला सूर्या धामणी धरणातून १०० दशलक्ष लिटर, उसगाव धरणातून २० व पेल्हार धरणातून १० दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. आता खोलसापाडा धरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याने ७० दशलक्ष पाणी अधिक मिळणार आहे. यासाठी १६४ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

त्यातच हे काम पूर्ण होण्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच, लोकसंख्या पाहता पाण्याची निकड अधिक भासणार आहे. त्यामुळे शहरात नैसर्गिक स्त्रोत निर्माण करण्याची गरज असून अमृत पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

water scarcity
कोविड लसीच्या नावावर ज्येष्ठ नागरिकाला १३ लाखांचा गंडा; दोघांना अटक

नव्याने खोलसापाडा धरण उभारले जात आहे. अमृत पाणी योजनेचे कामदेखील सुरू आहे. यापूर्वी कामात दिरंगाई होत असल्यामुळे ठेकेदारदेखील बदलले आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. नव्या योजनेमुळे पाण्याचा साठा वाढण्यास मदत होईल.
- डी. गंगाथरन, महापालिका आयुक्त

प्रशासनाने योजना राबवताना ठेकेदार कशा पद्धतीने काम करतो, याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून योजनेचे काम प्रत्यक्षात लवकर पूर्ण करता येईल. विविध भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी वसई विरार महापालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे.

- सुदेश चौधरी, माजी सभापती, स्थायी समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()