मुंबई : वाशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (Vashi RTO) नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट (APMC Market) सेक्टर 19 मध्ये जप्त वाहन ठेवण्यासाठी असलेल्या जागेचे नियोजन करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील (Hemangini patil) यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी उत्कृष्ट दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ड्राइविंग टेस्ट ट्रकची (ground drive test) उभारणी केली आहे. तर ट्रकसाठी जप्त केलेल्या वाहनांचे योग्यरित्या नियोजन केल्याने आता ड्राइविंग टेस्टसाठी कौशल्यपूर्ण चालकांची (Professional driving skills) निर्मिती करण्यासाठी मदत होणार असल्याचे गावंडे यांनी सांगितले आहे. (vashi RTO develops ground driving test for professional driving skills)
वाशी आरटीओ कार्यालयातून दैनंदिन ट्रान्सपोर्ट, नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांची ड्राइविंग टेस्ट घेण्यात येते गेल्या वर्षभरात नॉनट्रान्सपोर्ट 26174 तर 4258 ड्राइविंग टेस्ट घेण्यात आल्या असून अशा एकूण वर्षभरात 30 हजार 432 ड्राइविंग टेस्ट घेण्यात आल्या आहे. त्यानंतर आता या ट्रकची दुरुस्ती करून ट्रकच्या आजूबाजूला जप्त केलेल्या वाहनांचे ढिगारे सुद्धा हटवून सुटसुटीत ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
दुचाकीसाठी आठ प्रमाणे ट्रॅक तयार केला असून, चारचाकी एल ट्रकची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता ड्राइविंग टेस्टच्या संख्येत वाढ होणार असून, उत्तम चालक निर्माण करण्यास मदत होणार असल्याचेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.