Marathi Encyclopaedia Board : मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वशिलेबाजीला उत

पुण्यातील कार्यकर्त्याची मंत्रालयात धावाधाव
Marathi Encyclopaedia Board : मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वशिलेबाजीला उत
Updated on

मुंबई : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी म्हणून पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने सरकार दरबारी धावाधाव सुरू केली आहे. यासाठी काही राजकीय नेत्यांसह मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्यालाच विश्वकोश मंडळाचे अध्यक्षपद मिळावे म्हणून त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोचवला असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्राकडून देण्यात आले.

Marathi Encyclopaedia Board : मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वशिलेबाजीला उत
Nashik News : जोरदार पाऊस नसतानाही 3 वाडे कोसळले! अनेक वर्षापासून समस्या ‘जैसे थे’

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल 26 मे रोजी संपल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. या पदावर पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या परंतु स्वतःला साहित्यिक म्हणून  वावरत असेलल्या कार्यकर्त्याने मंत्रालयात मोठी ताकद लावली असून त्यावर निर्णय होण्याची शक्यता देखील अधिकार सूत्राकडून व्यक्त केली जाते.

Marathi Encyclopaedia Board : मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वशिलेबाजीला उत
Nashik News : जोरदार पाऊस नसतानाही 3 वाडे कोसळले! अनेक वर्षापासून समस्या ‘जैसे थे’

महाराष्ट्र राज्य  साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष पद मागील काही वर्षांपासून केवळ मुंबई, पुणे आणि त्या परिसरातील साहित्यिक आणि तज्ञांना दिले जाते. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील अनेक साहित्यिक आणि यावर महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक  श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आक्षेप घेतले आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती केली आहे. राज्यातील साहित्य विश्वाचा समतोल राखण्यासाठी यावेळी तरी पुण्याचा अपवाद वगळून विदर्भ मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक तज्ञांना साहित्य संस्कृती आणि विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जावी अशी मागणी या पत्रात केली आहे.

Marathi Encyclopaedia Board : मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वशिलेबाजीला उत
Nashik Crime News : अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या मुख्य संशयिताला बेड्या; सिल्वासा येथून घेतले ताब्यात

जोशी म्हणाले, साहित्य संस्कृती आणि विश्वकोश ही दोन्ही मंडळे आणि भाषा सल्लागार समिती अशी तीनही अध्यक्षपदे गेली कित्येक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील व्यक्ती नेमूनच भरली गेली व त्यातही पुणे या एकाच शहराला तिन्ही अध्यक्षपदे बहाल केली त्याकडे आपण लक्ष वेधले होते,तसेच या पार्श्वभूमीवर,या मंडळांची, समितीची अध्यक्षपदे देतांना महाराष्ट्र हा संयुक्त आहे,इतर विभागही त्यात आहेत,याचे जे भान न बाळगता प्रादेशिक असमतोल निर्माण करून ठेवला गेला त्याकडेही लक्ष वेधले होते असेही जोशी यांनी सांगितले.

Marathi Encyclopaedia Board : मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वशिलेबाजीला उत
Nashik News : सिन्नरमधील 40 रस्त्यांचे भाग्य उजळणार; तब्बल 70 कोटींचा निधी मंजूर

जोशी यांनी उपस्थित केलेले मुद्दे

- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे पासून तर डॉ राजा दिक्षित यांचेपर्यंत महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी अतिशय अभ्यासू,विद्वान,व्यासंगी, संशोधक आणि महाराष्ट्राला भूषणावह अशाच नावांची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे.या पदावर नियुक्तीसाठी निम्न दर्जाच्या व्यक्ती महाराष्ट्र त्यामुळे कृपया खपवून घेणार नाही .

- मुंबई,पुणेकेंद्री नियुक्त्या केल्या जात असल्याने विविध विभागांचा या नियुक्त्यांचा अनुशेष वाढला आहे.प्रादेशिक असमतोल त्याने निर्माण झाला आहे .  विदर्भाला तर याबाबत सापत्न वागणूक देत  दुर्लक्षच केल्या जाते आहे.

-साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच विश्वकोश मंडळ अध्यक्षांच्या रिक्त  पदांवर नियुक्ती करतांना  दोन्ही अध्यक्षपदे नागपूर, विदर्भातील पात्र व्यक्तींना आता दिली जावीत कारण तिन्ही अध्यक्षपदे या अगोदर एकट्या पुण्याला बहाल केली गेली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com