अरेच्चा! भाजी धुतली चक्क वॉशिंग मशीनमध्ये 

File Photo
File Photo
Updated on

ठाणे : कपडे सुकवण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर होतो हे ऐकलेय... पण पालेभाजी कोणी वॉशिंग मशीनमध्ये सुकायला टाकलेली ऐकले का? तर हा नागरिक सध्या हा नवीन प्रयोग घरोघरी करून पाहत असून त्याचा त्यांना सकारात्मक परिणामही दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. केवळ पालेभाजी सुकवण्यासाठी नाही, तर काही दिवस ताजी टवटवीत टिकून राहण्यासाठीही याचा उपयोग केला जात असल्याचे नागरिक सांगतात.

ताजी टवटवीत शेतातील पालेभाजी या लॉकडाऊन काळात आपल्या घरात येत आहे, परंतु पालेभाजी फ्रीजमध्ये ठेवली तरी जास्त दिवस टिकत नाही ती सुकून जाते. धुऊन ठेवली तर कुजते. यामुळे महिला वर्ग नेहमी पालेभाजी फ्रिजमध्येच टिकून राहण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. याचाच एक वेगळा प्रयोग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकही तो अजमावून पाहत आहेत. 

पालेभाजी धुतल्यास ती खराब होत असल्याने ती तशीच कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवली जाते, परंतु त्याच्या मुळाशी असलेल्या मातीने फ्रीज अनेकदा खराब होतो किंवा त्या मुळांना, भाजीला पाणी मारले असल्यास दोन दिवसांच्या वर भाजी टिकत नाही. पाने सुटसुटीत असलेली परंतु धुतलेली पालेभाजी तुम्हाला हवी असेल तर ती वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचा पर्याय आता आला आहे. या प्रयोगामुळे केवळ स्वच्छ धुतलेली आणि सुटसुटीत पालेभाजी मिळते. इतर वेळेस भाजी धुतल्यानंतर तिचा गोळा होतो, तिची पाने ऐकमेकांना चिकटतात. हे नको असेल तर अशा पद्धतीने भाजी स्वच्छ, साफ करू शकता असा संदेश हा प्रयोग करणारे प्रत्येक जण देत आहेत. 

...अशी आहे प्रक्रिया 
पालेभाजी सात ते आठ दिवस टिकवायची असल्यास एक बादली पाण्यात एक चमचा सोडा टाका आणि त्यात पालेभाजी धुऊन बाहेर काढा. त्यानंतर ती एका कॉटनच्या कपड्यात चांगली गुंडाळून वॉशिंग मशीनमध्ये ठेवा. स्पीन मोडवर पाच ते सहा मिनिटे भाजी सुकवा. तुम्हाला स्वच्छ आणि सुटसुटीत पालेभाजी मिळते. भाजी दोन दिवस फक्त टिकवायची असेल तर साध्या पाण्यात धुऊन नंतर वॉशिंग मशीनमध्ये ती वाळवू शकता. 

आम्हीही केला प्रयोग... 
स्वच्छ सुकलेली पालेभाजी खाण्यासही उत्तम लागते. शिवाय फ्रीजमध्ये ती दोन ते तीन दिवस टिकतही असल्याचे अनुभव अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. डोंबिवलीतील मनोज मेहता यांनीही हा प्रयोग केला असून त्यांनीही सोशल मीडियावर तो अनुभव शेअर करताच त्यांनाही अनेकांनी आम्हीही हा प्रयोग करून पाहिल्याचे सांगितले.

Vegetables washed in washing machine

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.