ठाकरे समर्थकांकडून तयार करण्यात आलेल्या त्या प्रतिज्ञापत्रांची गुन्हे शाखेकडून पडताळणी

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ठाकरे समर्थकांची सर्व 4682 प्रतिज्ञापत्रे तपासली असून त्यानुसार त्यांची पडताळणी करण्यासाठी पथके तयार केली आहेत.
police
policeSakal
Updated on
Summary

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ठाकरे समर्थकांची सर्व 4682 प्रतिज्ञापत्रे तपासली असून त्यानुसार त्यांची पडताळणी करण्यासाठी पथके तयार केली आहेत.

मुंबई - मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या समर्थनार्थ ठाकरे समर्थकांकडून तयार करण्यात आलेली 4,500 हून अधिक प्रतिज्ञापत्रे मुंबई पोलिसांनी 8 ऑक्टोबर शनिवारी रात्री कारवाई करत जप्त केली. या प्रकरणात निर्मलनगर पोलीस ठाण्याने अज्ञात इसमा विरोधात गुन्हा नोंदवला होता आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईत सापडलेल्या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने बुधवारी आपली टीम वसई, विरार, पालघर, कोल्हापूर, सोलापूर आणि इतर ठिकाणी पाठवली आहेत.

गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व 4682 प्रतिज्ञापत्रे तपासली असून त्यानुसार त्यांची पडताळणी करण्यासाठी पथके तयार केली आहेत. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी टीम कोल्हापूर, विरार, वसई, पालघर आणि इतर अनेक शहरांमध्ये पाठवली. ज्या व्यक्तींच्या नावाचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्यांनी खऱ्या अर्थाने ही प्रतिज्ञापत्रे दिली आहेत का याचा पोलीस तपासत आहेत. तसेच त्यांच्या नावाने तयार केलेल्या प्रतिज्ञापत्रांबद्दल त्यांना काही कल्पना आहे का, याची खातरजमा सुद्धा पोलीस तपासात करत आहेत. या समर्थकांनी त्यांच्या वतीने ही शपथपत्रे तयार करण्यासाठी किंवा नोटरी करण्यासाठी कोणाला नामनिर्देशित केले होते की नाही हे देखील पोलीस पडताळत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

प्रकरण काय?

या प्रकरणातील तक्रारदार काही दिवसांपूर्वी वांद्रे न्यायालयात गेला असता त्यांना दोन व्यक्ती आढळल्या ज्या प्रतिज्ञापत्रांवर नोटरीचा शिक्का मारत होत्या. कायद्यानुसार प्रतिज्ञापत्र तयार करणार्‍या व्यक्तीने नोटरीसमोर शारीरिकरित्या उपस्थित राहणे आवश्यक आहे. या प्रकरणात ज्यांच्या नावाने प्रतिज्ञापत्र तयार केले जात होते ते व्यक्ती तेथे उपस्थित नव्हते.या संदर्भात तक्रारदाराने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करत 4500 हून अधिक प्रतिज्ञापत्र जप्त केली.

'आम्ही सर्व ४,६८२ प्रतिज्ञापत्रे तपासली आणि त्यानुसार त्यांची पडताळणी करण्यासाठी पथके तयार केली. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आम्ही आमची टीम कोल्हापूर, विरार, वसई, पालघर आणि इतर अनेक शहरांमध्ये पाठवली आहे. ज्या व्यक्तींच्या नावाचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्यांनी खऱ्या अर्थाने ही प्रतिज्ञापत्रे दिली आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात आम्ही अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. चौकशीनंतर कारवाई करू.'

- संग्रामसिंग निशानदार, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, मुंबई पोलीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.