कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...

कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...
Updated on

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात एक औषध भारतीय बाजारात येणार आहे. अँटिव्हायरल ड्रॅग फेविपिराविरपासून बनवण्यात येणाऱ्या फॅबि-फ्लू ची सध्या सगळीकडे  जोरदार चर्चा सुरु आहे. भारतात ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही कंपनी या गोळ्यांचं उत्पादन आणि मार्केटिंग करणार आहे. केंद्रसरकारकडून या कंपनीला तशी परवानगी देण्यात आली आहे.

देशात सर्वांना या औषधाचा पुरवठा करण्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणांशी मिळून ग्लेनमार्क ही कंपनी काम करणार आहे. कोरोनाच्या संवेदनशील स्थितीत ही गोळी आशेचा किरण मनाली जातेय. फॅबि-फ्लू या एका गोळीची किंमत ही १०३ रुपये निश्चित करण्यात आली आहे. जाणून घेऊयात याच फॅबि-फ्लू बद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी 

काय आहे हे औषध 

हे औषध म्हणजे कोणतीही लस किंवा कोणतंही लिक्विड नसून तोंडावाटे खाण्याच्या गोळीच्या स्वरूपात असणार आहे. 

ही गोळी कुणी घ्यावी ? 

हे औषध अशांनी घ्यायचं आहे ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत किंवा ज्यांना कोरोनाची खूप कमी लक्षणं दिसतायत. सध्या कोरोना संसर्गाने रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता पाहायला मिळतेय. अशात ही गोळी अत्यंत महत्त्वाची मनाली जाते. ही गोळी डायबिटीस आणि हृदयरोग असणाऱ्या कोरोना रुग्णांना देखील दिली जाऊ शकते असं कंपनी म्हणतेय. दरम्यान ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर उपलब्ध होणार  आहे. 
  
या गोळीचे किती डोस घ्यावेत ? 

फेविपिराविर या ड्र्गपासून ही गोळी बनवण्यात आली आहे. कंपनीकडून दिल्या गेलेल्या माहितीत पहिल्या दिवशीच्या या औषधाचे १८०० एमजी चे दोन डोस घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील  १४ दिवस  ८०० एमजी चे दिवसात दोन डोस घायचे आहेत. 

या औषधाची किंमत किती ?

हे औषध २०० एमजी मध्ये उत्पादित केलं जाणार आहे. या एका गोळीची किंमत १०३ रुपये असणार आहे. तर ३४ गोळ्यांच्या संपूर्ण किटची किंमत ३ हजार ५०० रुपये असणार आहे. हे एक अँटिव्हायरल औषध आहे.  

औषधाच्या उत्पादनाबद्दल ? 

कंपनीच्या माहितीप्रमाणे देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि प्रति रुग्ण या औषधाची गरज पाहता पहिल्या महिन्यात ८२ हजार ५०० रुग्णांसाठी कंपनी या औषधाचं उत्पादन करणार आहे. यानंतर कंपनी देशातील कोरोना परिस्थिती पाहता आणखी उत्पादनावर भर देणार आहे. 

कुठे तयार होणार औषध? 

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकलेश्वरमध्ये या औषधाचं ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडीएंट म्हणजेच API चं उत्पादन होणार आहे. याचसोबत हिमाचलमध्ये याचं फॉर्म्युलेशन तयार केलं जाणार आहे. 

कसा होणार पुरवठा? 

या औषधाच्या पुरवठ्यासाठी सध्यातरी कोणत्याही रुग्णालयांशी टायप नाही. हे औषध रुग्णांपर्यंत कसं पोहोचवलं जावं यावर सध्या कंपनी भर देणार आहे. यानंतर गरज आणि वेळेनुसार काही टायप करायचे का याबद्दल विचार केला जाणार आहे. 

very important facts of fabi flu tablets ment to cure covid 19 patients manufactured by glenmark


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()