Dombivali News : ज्येष्ठ लेखक - नाटककार आनंद म्हसवेकर यांचे निधन

मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ नाट्य लेखक, दिग्दर्शक, निर्माता तसेच कवी आनंद म्हसवेकर (वय 69) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
Anand Mhasvekar
Anand Mhasvekarsakal
Updated on

डोंबिवली - मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ नाट्य लेखक, दिग्दर्शक, निर्माता तसेच कवी आनंद म्हसवेकर (वय 69) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर डोंबिवलीतील स्मशानभूमीत रविवारी दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी कांता, मुलगा विनय, मुलगी नीता, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी मुंबई येथे म्हसवेकर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवल्याने नाट्य सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

डोंबिवलीतील शिवमंदिर रोडच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील अभिनेते तथा दिग्दर्शक विजय गोखले, लेखक तथा दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार, अभिनेता मुकेश जाधव, अभिनेत्री निता दोंदे, अभिनेता मनोहर सोमण, दिग्दर्शक शिरीष राणे, नाटककार कुमार सोहनी, नाटककार देवेंद्र पेम, अभिनेत्री श्रद्धा मोहिते, अभिनेता प्रणव रावराणे, अभिनेत्री अमृता रावराणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ नाटककार आनंद म्हस्वेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील म्हसवे या छोट्याशा गावात 1955 साली झाला. त्यांचे शिक्षण सातारा जिल्हा आणि मुंबई येथे झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाचवड येथे झाले आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठीत बी.कॉम आणि एम.ए. 1979 ते 2000 पर्यत त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम केले. 2000 मध्ये त्यांनी पूर्णवेळ लेखक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

'मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते यूएसए'

विशेष म्हणजे 25 व्यावसायिक नाटके, 15 प्रायोगिक नाटके, 42 एकांकिका,14 चित्रपटांसाठी कथा-पटकथा-संवाद लेखन, 12 दूरदर्शन मालिकांसाठी 2500 हून अधिक भागांचे लेखन, कवितासंग्रह आणि 5 पुस्तके इतकी विपुल साहित्यसंपदा ज्यांच्या लेखणीतून उतरली ते ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर यांच्या "मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते यूएसए" या ग्रंथाली प्रकाशनातर्फे आत्मचरित्र्याचे प्रकाशन रविवारी (दि.13) संध्याकाळी मुंबईतील दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणार होते.

ज्येष्ठ लेखक तथा दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे, पद्मश्री नयना आपटे, नाटककार-दिग्दर्शक-अभिनेते संतोष पवार, आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आत्मचरित्र प्रकाशन समारंभ संपन्न होणार होता. तथापी तत्पूर्वीच नाट्य, मालिका आणि चित्रपटसृष्टीच्या कोंदणातला हिरा निखळल्याच्या भावना अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केल्या.

साहित्यिक प्रवास असा..

आनंद म्हसवेकर यांचा जन्म 1 मे 1954 रोजी सातारा जिल्ह्यातील म्हसवे नामक छोट्याशा गावात झाला. त्यांचे शिक्षण सातारा आणि मुंबईत झाले. प्राथमिक शिक्षण पाचवड येथे घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठीत बीकॉम आणि एमएची पदवी प्राप्त केली. 1979 ते 2000 पर्यंत त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. 2000 मध्ये त्यांनी पूर्णवेळ लेखक म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

यू टर्न, कथा, जोडी जमली तुझी माझी, केंव्हा तरी पहाटे, जमलं बुवा एकदाचं, गॉड फादर, ह्यांच हे असंच असतं, एकदा अचानक, सगळं काही सुखासाठी, मदर्स डे, एक दोन तीन चार, डरना अपराध है, रेशीम गाठी, चॉईस ईज युवर्स, दुधावरची साय, फिफ्टी फिफ्टी, सासू नंबर वन, असे नवरे अशा बायका, असे पाहुणे येती, धाव दुर्गे धाव गं, ते एक क्षितिज, चाकोरी, पोपट हरवलेली माणसे, गोल गोल राणी, बायको माझी लई भारी, धर्मकांड, तेरा दिवस प्रेमाचे, एस्क्यूज मी प्लीज, पाहुणे आले पळा पळा, शूटिंग शो, घर जपायला हवं, सुनेच्या रशीला सासू, सावधान प्रेम चालू आहे, अथांग, स्टड फार्म, सूर्य मागतो चांदणे दे, भेजा आऊट, अशा नाटकांचे लेखन/दिग्दर्शन आनंद म्हसवेकर यांनी केले.

असा मी काय अपराध केला, भरत आला परत, दुर्गा म्हणत्यात मला, जन्म, आम्ही बोलतो मराठी, साद, तृषार्त आणि झेंटलमन हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तर मृत्यू दान, कानाखाली गणपती काढीन, युवा महोत्सव (युथ फेस्टीव्हल, आकांत, गुरू साक्षात् परब्रह्म, ट्रेलर, शांती, लागीर, प्रार्थना कायद्याची आहे, मूषक कथा, तिच्या आत्म्यास अशांती लाभो, अजब तुझे सरकार, शोक, नो अपील, मानवतेचा तमाशा, वांझ वेणा, जिगनानी, विटले रंग या त्यांच्या एकपात्री प्रयोगांनी रसिक प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले होते.

ह्या गोजिरवाण्या घरात, चार दिवस सासूचे, चिरंजीव सौभाग्य कांक्षीणी, कुरूक्षेत्र, उचापती, भाग्यलक्ष्मी, वाडा चिरेबंदी, गिरिड इंटरपोल, दोष ना कुणाचा, कभी ये कभी वो (हिंदी) आणि हाल कैसा है जनाब का (हिंदी) या त्यांच्या टिव्ही मालिका गाजल्या. असा मी काय गुन्हा केला आणि आम्ही बोलतो मराठी या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन, तर भाऊचा धक्का, असा मी काय गुन्हा केला, आम्ही बोलतो मराठी आणि भरत आला परत या चार चित्रपटांत अभिनय केले.

प्राप्त पुरस्कार...

2008-09 च्या यू टर्नसाठी झी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक नाट्य महोत्सव 2008-09 चा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक नाट्य महोत्सव 2008-09 चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, 1995 सालचा चतुरंग सवाई लेखक पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक आचार्य अत्रे पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक गोपीनाथ सावरकर पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक जी. बी. देवल पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखक पुरस्कार, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय उत्कृष्ट लेखक पुरस्कार, मुंबई दूरदर्शन माणिक पुरस्कार आणि सन्मित्र ठाणे पुरस्कार, अशा नामांकित पुरस्कारांचे आनंद म्हसवेकर मानकरी ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()