मुंबई ः ऑस्ट्रेलिया संशोधक मायकल ग्रीगर याने एपोकॅलीप्टिक नावाचा व्हायरस येणार असल्याचा दावा केला होता. या नव्या व्हायरसमुळे अक्खं जग संकटात येणार असल्याचे त्याचे म्हणणे होते. शिवाय हा व्हायरस पोल्ट्रि फार्म मधून पसरेल असे ही सांगण्यात आले होते.
मात्र, हा दावा पुर्णपणे खोटा असुन या दाव्यात कोणतही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कुक्कूटपालन व्यवसायावर याचा परिणाम होईल या चिंतेने हा दावा खोटा आणि या दाव्यात कोणतही तथ्य नाही असे मुंबई पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियन संशोधकाने केलेला हा दावा खोटा आणि खोडसाळ असल्याचं डॉ..रानडे यांनी सांगितले आहे. असा कोणताही व्हायरस पोल्ट्री फार्ममधून येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. याआधीही कोरोना व्हायरस चिकन मधून पसरतो अश्या अफवांचा सोशल मिडियावर पाऊस पाडण्यात आला होता. त्यामूळे , कुक्कूटपालनाचा व्यवसाय करणार्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता या नव्याने एपोकॅलीप्टिक नावाच्या व्हायरसमुळे संपुर्ण जगात परिणाम होईल हा दावा करण्यात आला आहे. त्यावर डॉ. रानडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांवर एपोकॅलीप्टिक हा शब्द सतत ऐकतोय. काही तरी मोठा रोग असल्याप्रमाणे आत्ता या शब्दाचा वापर होऊन, काही तरी मोठा रोग पोल्ट्री फार्म वा पक्षांमधून पसरणार आहे आणि जगातली अर्धी लोकसंख्या त्यामुळे नष्ट होणार आहे अशी बातमी पसरली आहे. त्यात काहीही तथ्य नाही. एपोकॅलीप्टिक या शब्दाचा अर्थ विश्वसंहारक मग ती कोणतीही गोष्ट असू शकते. त्यामुळे अश्या प्रकारच्या कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असा कोणताही विषाणू पक्षी फार्म पासून पसरलेला नाही.
- डॉ. अजित शंकर रानडे, विभाग प्रमुख, कुक्कुटपालनशास्त्र, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.