Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai Metro Station: आतापर्यंत इन्स्टाग्रामवर 18 हजार पेक्षा जास्त युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच यावर भन्नाट कमेंट्सही केल्या आहे.
Mumbai Metro Station Viral Video
Mumbai Metro Station Viral VideoEsakal
Updated on

अलिकडील काळात सोशल मीडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ असे असतात की, ते लोकांची मने जिंकतात.

दरम्यान मुंबई मेट्रो स्टेशनवरील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका चिमुकल्याच्या भीती आणि गमतीच्या भावना दिसत आहेत. (Mumbai Metro Station Viral Video)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुकला मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. प्रवेशावेळी तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक या चिमुकल्याची तपासणी करतात.

तापसणीवेळी या लहान मुलाच्या खिशात खेळण्यातील पिस्तूल सापडते. पिस्तूल सापडल्यानंतर सुरक्षा रक्षक आपल्या वरिष्ठांकडे पाहत काहीतरी बोलतो. त्यावेळी हा चिमुकला घाबरतो आणि आपले कान पकडतो.

Mumbai Metro Station Viral Video
Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

हे सर्व घडताना चिमुकला आपण काहीतरी चूक केल्याच्या भावनेने जेव्हा कान पकडतो तेव्हा मेट्रो स्टेशनवर उपस्थिती असलेले सुरक्षा कर्मचारी आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलेला पाहायला मिळते.

हे सुरक्षा रक्षक आपली मजा घेत असल्याचे लक्षात येताच चिमुकला त्यांच्या हातातून पिस्तूल घेऊन पळ काढताना दिसत आहे.

Mumbai Metro Station Viral Video
Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

सध्या प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एक एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत इन्स्टाग्रामवर 18 हजार पेक्षा जास्त युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच यावर भन्नाट कमेंट्सही केल्या आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही युजर या चिमुकल्याचा व्हिडिओ शेअर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.