Video Viral: अंधेरीतील मंदिरात महादेवाचा नंदी पितोय दूध, पाणी; अफवेमुळे मंदिरात नागरिकांची तुफान गर्दी

व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मंदिरात नागरिकांची तुफान गर्दी
Video Viral
Video ViralEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून महादेवाचा नंदी दूध पितो, गणपती दुध पितो अशा स्वरूपाच्या अफवा वारंवार समोर येत असतात. अशीच एक अफवा मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील गुंदवली येथुन समोर आली आहे. तर याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील गुंदवली परिसरातील महादेव मंदिरातील नंदी अचानक दूध आणि पाणी पिऊ लागल्याची अफवा पसरली आहे. नंदी दूध आणि पाणी पित असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.

Video Viral
Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक

अंधेरी पूर्वेतील गुंदवली येथील एका जुन्या शिव मंदिरात गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. शिव मंदिरात शिवलिंगासमोरील असलेला नंदी अचानक दूध व पाणी पिऊ लागला अशी बातमी अंधेरी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

Video Viral
Pune Satara Highway : खंबाटकी बोगद्यात तीनदिवसात दोनदा लोखंडी अँगल गाडीवर आदळला अन्...

श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्याने हा दैवी चमत्कार समजून परिसरातील नागरिकांनी खास करून महिलांनी शिव मंदिरात नंदीला पाणी आणि दूध वाचण्यासाठी मोठी गर्दी केली. श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्याने अनेकांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत होते. अशातच ही अफवा समोर आली आणि याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.

Video Viral
Mumbai Police: ...अन् तो पोलीस स्वतःच झाला रुग्णवाहिका, सतर्कतेचे सर्व स्तरातून होतंय कौतुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()