विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी दोन गटांत जोरदार हाणामारीची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये एकमेकांशी हाणामारी होताना दिसत आहे. मात्र या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नालासोपारा येथे लोकल ट्रेनच्या सीटवरून एक गट आणि प्रवाशी यांच्यात वाद झाला. काही वेळाने हे प्रकरण इतके वाढले की ट्रेनमध्ये हाणामारी सुरू झाली. सीटवर बसल्याचा आरोप करत सात ते आठ जण दुसऱ्या प्रवाशाला बेदम मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर इतर प्रवाशांनी त्याला मारण्यास नकार दिल्यावरही तो मान्य करत नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून प्रवाशाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
याप्रकरणी वसई रेल्वे स्थानकाचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी सांगितले की, प्रवासी नालासोपारा येथील रहिवासी आहे. विरार ते चर्चगेट या लोकल ट्रेनमध्ये सकाळी सातच्या सुमारास वाद झाला.या घटनेनंतर पोलिसांनी प्रवाशाशी संपर्क साधला आहे. प्रवासी मुंबईला कामावर निघाला आहे. कामावरून परतल्यावर तक्रार देण्याचे प्रवाशाने सांगितले आहे. त्यानंतर आरोपी प्रवाशांवर कारवाई केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.