Vidhan Sabha Election 2024: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतल्या 25 जागांवर दावा? 'या' जागा लढवण्याची जोरदार चर्चा

Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांसाठी आता महाविकास आघाडीनं रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
Uddhav Thackeray news
Uddhav Thackeray newsesakal
Updated on

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागांवर दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या जागांसाठी ठाकरेंनी तयारी सुरु केली आहे, पण महाविकास आघाडी या ठाकरेंच्या या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं आहे. मुंबईतल्या या जागा नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊयात.

Uddhav Thackeray news
Pooja Khedkar: पूजा खेडकरांनी धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस? जबाब नोंदवण्यासाठी अद्याप वाशिममधून पुण्याकडं रवाना नाही

लोकसभेप्रमाणं विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ ठाकरेंची शिवसेना आपल्याकडं ठेवण्यास आग्रही असल्याचं साम टीव्हीच्या सुत्रांकडून कळतंय. त्यानुसार मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी २५ मतदारसंघांवर ठाकरेंचा दावा असणार आहे.

Uddhav Thackeray news
Naxal IED Blast: छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या, त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळं मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड मिळालं आहे, अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो.

Uddhav Thackeray news
OpenAI Safety Concern : चॅटजीपीटी सुरक्षित नाही! OpenAIच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीवर केला मोठा आरोप

महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचं कळतं आहे. तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथं शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचा नियोजन करत असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray news
Dilip Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांना लाचखोरीमुळे सक्तीची निवृत्ती? ठाकरे सरकारच्या काळात झालं होतं निलंबन

2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील ठाकरेंनी आपल्या चारपैकी तीन जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळं एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असेल.

Uddhav Thackeray news
T20 World Cup:16 वर्ष, 9 महिने अन् 5 दिवस...भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांचे हटके ट्विट; दिला खास सल्ला

शिवाय, वांद्रे पूर्वमधून वरून सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचीही चर्चा आहे.

Uddhav Thackeray news
India Squad for Sri Lanka Tour: वातावरण तापलं! कर्णधार कोण? 'त्या' दोघांवरून गौतम गंभीर अन् जय शाह यांच्यामध्ये मतभेद

ठाकरेंची शिवसेना मुंबईतील 'या' संभाव्य जागा लढणार

१) शिवडी

२) भायखळा

३) वरळी

४) माहीम

५) चेंबूर

६) भांडुप पश्चिम

७) विक्रोळी

८) मागाठाणे

९) जोगेश्वरी पूर्व

१०) दिंडोशी

११) अंधेरी पूर्व

१२) कुर्ला

१३) कलिना

१४) दहिसर

१५) गोरेगाव

१६) वर्सोवा

१७) वांद्रे पूर्व

१८) विलेपार्ले

१९) कुलाबा

२०) वडाळा

२१) चांदीवली

२२) बोरिवली

२३) मलबार हील

२४) अनुशक्ती नगर

२५) मानखुर्द शिवाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.